Site icon Jan Bharat Samachar

अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पुर ; भक्त पुंडलिक मंदिरात पाणी ; वाहती जलपर्णी

Spread the love


भक्ती सोपान पुलावर पाणी ; के. टी. बंधाऱ्यास जलपर्णीचा विळखा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथुन वाहणा-या इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या संततधारेच्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाण्यामुळे इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी दुतर्फा पसरले असून नदी काठाचा राम मंदिरा कडील रस्ता रहदारीला बंद झाला आहे. पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरले आहे. राम घाट, भक्त पुंडलिक मंदिर, स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात पाणी घुसले आहे. यामुळे नदी घाटावर काही ठिकाणी रहदारी बंद झाली आहे.
पुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलांचे वर दुतर्फा भाविकांसह नागरिकांनी गर्दी करुन पुराचे पाणी पाहत सेल्फी चा आनंद लुटत आहेत. दक्षता म्हणून पुलांवर जास्त वेळ उभे राहू दिले जात नाही. इंद्रायणी नदी घाटाचा परिसर, नवीन स्काय वॉकचे खाली पायऱ्या उतरता येत नाही. भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून श्रींचे दर्शन बंद झाले आहे. या मुळे नवीन स्काय वॉक वरून भक्त पुंडलिक मंदिरा जवळ पुला वरून खाली उताराने ये जा बंद झाली आहे. इंद्रायणी नदी वरील घाटा लगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ परिसरात पाणी आले आहे. भक्ती सोपान पुलाला पाणी लागले असून येथील दोन के. टी बंधारा पर्यंत पाणी आलेले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास येथे साचून राहिलेली अडकलेली जलपर्णी पाण्यात वाहून जाण्यास मदत होणार आहे. येथे जलपर्णी अडकून साचलेली आहे. काही जलपर्णी जुन्या दगडी पुलाला अडकलेली असून ऊरचे पाण्यात वरून वाहून आलेली जलपर्णी पुढे पुराचे पाण्यात वाहून जाताना दिसत आहे.
नदी घाटावरील दुतर्फा रस्ते रहदारीला धोकादायक असल्याने नागरिकांनी, भाविकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन मुख्याधिकारी मांडव खांडेकर यांनी केले आहे. अग्निशमन विभाग, आपत्ति व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिली आहे. आळंदी पंचक्रोशीत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आळंदीतील रस्त्यांवर पाणी वाहत आहे. सांडपाणी वाहू नलिका क्षमते पेक्षा जास्त पाणी येत असल्याने अनेक ठिकाणी चेंबर मधून पाणी उफाळलेले आहे. चेंबर तुंबल्याने तसेच पाणी जाण्यास मार्ग मिळत नसल्याने हजेरी मारुती मंदिरालगत प्रदक्षिणा मार्गावर पाणी साचत आहे. वडगाव रस्त्यावरून पावसाचे पाण्यात परिसरातील कचरा हि वाहत येत आहे. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासह आपत्ती व्यवस्थापन कक्षातुन नदी घाटावर नजर ठेवण्यात येत आहे. इंद्रायणी नदी घाटावरील भक्ती सोपान पूल, भक्त पुंडलिक मंदिर मध्येपानी शिरले आहे. नदीच्या दुतर्फा रस्ते धोकादायक असल्याने रहदारीस पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी खांडेकर यांनी तसेच आळंदी मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे. सर्वत्र जोरदार पाऊस होत असल्याने बळीराजात समाधान आहे. मात्र शेतीचे कामे करायची असल्याने पाऊस कमी होण्याची वाट हि पहिली जात आहे. अनेक शेतकरी यांचे शेत मशागतीची कामे उरकण्यास अवधी आवश्यक आहे. होत असलेल्या पावसाने उजनी धरण मध्येपानी पातळी वाढत आहे.
परिसर कचरामुक्त ठेवण्यास प्रशासनाने प्राधान्य देत पुराचे पाण्यात वाहून आलेला कचरा व जलपर्णी काढण्याचे कामास गती देण्याची आवश्यकता आहे. पाण्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदी परिसर भाविकांचे लक्ष वेधून घेत असल्याने नदीवर दुतर्फा गर्दी दिसत आहे. पावसाने धुळीचे साम्राज्य कमी झाले आहे. मात्र शहरातील मनकर्णिका नाल्याची दुरावस्था कायम असल्याने नाल्यात राडा, रोडा, गवत वाढले आहे. भागीरथी नाल्यावरून पाणी वाहत असून गवत चीखलमय रस्ता झाला आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. भागीरथी नाला मार्ग म्हणून विकसित होत असून पितळी गणपती मंदिर ते शनी मंदिर आणि हजेरी मारुती मंदिर ते भोई धर्मशाळा या दरम्यान रस्त्याची दुरावस्था कायम आहे. उर्वरित भागीरथी नाल्याचे विकास काम मार्गी लावण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने करण्यात आली आहे.

Exit mobile version