Site icon Jan Bharat Samachar

महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलांची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२५ !!

Spread the love

पुणे जिल्हा संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात; ठाणे संघाकडून पराभव !!

पुणे, : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलांच्या (१३ वर्षाखालील) गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघाला ठाणे संघाकडून ०-१ असा पराभव स्विकारावा लागला आणि पुणे संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.

धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवताना अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. आज सकाळी ठाणे संघाविरूध्द झालेल्या सामन्यामध्ये पुणे संघाला १-० असा पराभव स्विकारावा लागला. सामन्यचप्रया सुरूवातीला दोन्ही संघांनी आक्रमक सुरूवात केली. १५ व्या मिनिटाला शिवम रॉय याने गोल करून ठाणे संघाला महत्वपूर्ण अशी १-० आघाडी मिळवून दिली. पुर्वार्धात ही आघाडी कायम होती. उत्तरार्धात पुणे संघाला ही आघाडी मोडून काढता आली नाही आणि पुणे संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

उपांत्य फेरीमध्ये दाखल होताना पुणे संघाने हिंगोली संघाचा ६-० असा तर, उप-उपांत्यपुर्व फेरीमध्ये रायगड संघाचा २-१ असा पराभव केला होता. पुणे संघासह स्पर्धेत अमरावती, अकोला, हिंगोली सातारा, ठाणे, अहमदनगर, पालघर, अमरावती आणि मुंबई हे संघ सहभागी झाले होते.

Exit mobile version