Jan Bharat Samachar

केरळात साऊथ एशियन नृत्य संमेलन जल्लोषात  सागर रोकडे यांनी केले महाराष्ट्राचे नेतृत्व 

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : केरळ येथे साऊथ एशियन नृत्य संमेलन सांस्कृतिक युवा महोत्सव २०२५ जल्लोषात पार पडले. या महोत्सवात केरळ विधानसभेचे आमदार शफी परंबील यांचा पुणे सांस्कृतिक विभाग प्रमुख सागर रोकडे यांच्या हस्ते पारंपारिक मावळी पगडी घालून सत्कार करण्यात आला.

या महोत्सवात महाराष्ट्रातून १४ कलाकारांच्या टीम चे नेतृत्व पुणे सांस्कृतिक विभाग प्रमुख सागर रोकडे यांनी केले. यात १६ ते १८ मे २०२५ या कालावधीत साऊथ एशियन नृत्य संमेलन केरळ येथील वडकरा येथे जल्लोषात झाले. या संमेलनात सहभागी राज्य यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा, दिल्ली, नेपाळ, भूतान, आंध्र प्रदेश यांचा समावेश होता. सहभागी कलाकारांत सागर रोकडे, विशाखा रोकडे, अँड. दिनेश भंडारे, स्वरांजली भंडारे, रितेश तपकीरे, त्रिशरण रोकडे, साहिल गायकवाड, कुणाल इतकर, सार्थक ढेरे, प्रेम चाबुकस्वार, श्रुती जाधव, जागृती कारंडे, ज्योती परदेशी, कृष्णाली सुपनर, संस्कृती सुपनर या कलाकारांचा समावेश या संमेलनात होता.

केरळा राज्याचे आमदार शफी परंबील यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य संघाने पारंपरिक पद्धतीने मावळी पगडी घालून उत्साही जल्लोषात केला. साऊथ एशियन कॉन्फरन्स सांस्कृतिक युवा महोत्सव २०२५ केरळचे आयोजन जगदीश भाई यांनी केले होते. केरला राज्याचे आमदार शफी परंबील यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य संघाने पारंपरिक पद्धतीने मावळी पगडी घालून उत्साही जल्लोषात केला. या प्रसंगी दिल्ली चे धर्मेंद्र भाई, आंध्र प्रदेश चे भार्गव भाई, हिमाचल प्रदेश नीरज भाई, गुजरात नितीन रावत, गोवा प्रदीप मापकर, कर्नाटक मुथुराज, महाराष्ट्र टीमचे सागर रोकडे, आयोजक जगदीश भाई आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version