Site icon Jan Bharat Samachar

बोपोडी हरीश रेल्वे ब्रिज भुयारी मार्ग खाली गेल्या अनेक दिवसापासून सकाळी ड्रेनेज लाईन तुंबून बोगद्यामध्ये घाण पाणी साचत असते यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास

Spread the love

पुणे. बोपोडी हरीश रेल्वे ब्रिज भुयारी मार्ग खाली गेल्या अनेक दिवसापासून सकाळी ड्रेनेज लाईन तुंबून बोगद्यामध्ये घाण पाणी साचत असते यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हा त्रास सातत्याचा असून यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत तरीसुद्धा प्रश्न सुटत नव्हता यामुळे महापालिकेचे ड्रेनेज विभागाचे प्रमुख आयु,गोजारे साहेब यांच्याशी चर्चा करून वॉर्ड ऑफिसर आयु ,धापेकर साहेब यांच्याशी चर्चा करून सोमवार दिनांक 2 जुन 2025 रोजी.

*रिपाई नेते मा.परशुराम वाडेकर* यांनी स्वता ड्रेनेज विभागाचे पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय बिल्डिंगचे अधिकारी व औंध-क्षेत्रीय कार्यालय ऑफिसचे इंजिनिअर यांना जागेवर बोलून पाहणी करण्यात आली व तातडीने यासंदर्भात यावर मार्ग काढण्यासाठी योग्य ते उपाय योजना करण्यास साठी सूचना करण्यात आले त्या पद्धतीने लवकरच तिथे काम सुरू करून हा प्रश्न मार्गी लागेल असे अधिकाऱ्याने सांगितले याप्रसंगी हा पुणे महापालिकेचे ड्रेनेज विभागाचे अधिकारी आयु अल्बर साहेब, आयु. सावरकर साहेब ,आयु सागर शिंगारे हे अधिकारी उपस्थित होते

Exit mobile version