Site icon Jan Bharat Samachar

३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा – जगभरात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उत्स

Spread the love

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित न राहता, जगभरातील ६२ देशांमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक थाटात साजरा होणार आहे. “आम्ही मावळे”, “आम्ही पुणेकर” आणि “श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार” यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य आणि ऐतिहासिक उपक्रम राबवला जात आहे. अमेरिका, लंडन, जपान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधील हजारो शिवभक्त आपापल्या देशांतून शिवराज्याभिषेकाच्या स्मृतीला मानाचा मुजरा करणार आहेत.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणारा छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा ४ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पुण्यातील लाल महाल येथे ३५२ महिलांच्या हस्ते महाआरती आणि महाराजांच्या प्रतिमेचे औक्षण महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले हा सोहळा मराठा परंपरेचा सन्मान, स्त्रीशक्तीचे गौरवगान आणि शिवराज्याभिषेकाच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचे प्रतीक ठरेल.
यंदाचा शिवराज्याभिषेक उत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज ज्या किल्ल्यांवर आणि शहरांमध्ये वास्तव्य करत होते – जसे की सुरत, आग्रा आणि अन्य ऐतिहासिक स्थळांवरही हा उत्सव साजरा केला जाणार आहे. जगभरातील शिवभक्त मराठी संस्कृती आणि इतिहास जपत आपल्या देशांतून हा गौरवपूर्ण क्षण साजरा करणार आहेत.
या उपक्रमाचा उद्देश केवळ ऐतिहासिक स्मृती जागवण्यापुरता मर्यादित नसून, महाराजांचे पराक्रम, विचारधारा आणि आदर्श मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. हा ऐतिहासिक उत्सव सामाजिक व सांस्कृतिक जाणीवेचा जागर घडवेल.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले यंदा जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकनासाठी प्रस्तावित झाले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा या ऐतिहासिक वारशाच्या जागतिक प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठा साम्राज्याची ओळख अधिक दृढ करेल.ह्यावेळी संस्थेचे संस्थापक परागमामा मते, अध्यक्ष अनिकेत घुले, उपाध्यक्षआशा राऊत (उपयुक्त घनकचरा विभाग)
संगीता जयस्वाल
आशा राऊत ( उप आयुक्त महानगरपालिका )
विजयमाला पवार – वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभिनेत्री सोनल पवार सागर पवार,दिनेश कदम, राज साहेब देशमुख, युवराजदादा निंबाळकर उपस्थित राहणार आहेत नरेंद्र डोईफोडे सुनील पाटील हेमंत जाधव
आम्ही मावळे प्रतिष्टान श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार आम्ही पुणेकर, पुढाकाराने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
,

Exit mobile version