Site icon Jan Bharat Samachar

भवानी पेठेतील बेकायदेशीर ऑर्किड शाळेवर करवाई करा वंचित बहुजन माथाडी आघाडी कडून पालिकेवर धरणे आंदोलन

oplus_2

Spread the love

पुणे. भवानी पेठेतील जय सोसायटीतील ऑर्किड शाळा सोसायटीतील आवारात सुरू असून अतिशय धोकादायक इमारतीत सुरू आहे … या संदर्भात वंचित बहुजन माथाडी आघाडी यांनी आज पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढत आंदोलन केले.

जय सोसायटीची धोकादायक इमारत पाडण्यात यावी आणि जय सोसायटीतील सदस्यांना सोसायटी रीडेव्हलपमेंटला देण्यात यावी , धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबतचा खेळ पालिका प्रशासनानं थांबवावे अशा मागण्या वंचित बहुजन माथाडी संघटनेचे अध्यक्ष अजय भाल शंकर यांनी केल्या आहेत

या वेळी पुणे महानगर पालिकेच्या मुख्य गेटवर आंदोलन कर्त्यांची अडवणूक करण्यात आली.. सुरक्षा रक्षक आणि आंदोलन करते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली महानगर पालिका आयुक्त यांची भेट शिष्ट मंडळाची नाकारण्यात आली नंतर वंचित कार्यकर्त्यांनी गेटवर बसून जोरदार घोषणा दिल्या

काही वेळाने पालिका प्रशासन जागेवर आले आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना भेटून निवेदन स्वीकारले या वेळी अजय भाल शंकर, चंद्रकांत कांबळे आणि वंचित बहुजन माथाडी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते

Exit mobile version