Site icon Jan Bharat Samachar

पुणे महापालिकेच्या वतीने चिखलवाडी,बोपोडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नवीन टाकीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण

Spread the love

पुणे.पुणे महापालिकेच्या वतीने चिखलवाडी,बोपोडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नवीन टाकीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या टाकीमुळे बोपोडी,चिखलवाडी,औंध रोड, मुंबई-पुणे रोड व भोईटे चाळ परिसरातील हजारो नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी मा.उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हे काम वेळेत पूर्ण करून घेतले.आज दुपारी १२ वाजता टाकीच्या शेवटच्या टप्प्याची पाहणी पुणे महानगरपालिकेचे मा.नंदकुमार जगताप (मुख्य अभियंता,पाणी पुरवठा विभाग )मा.शोभाताई घोलप(अभियंता,समान पाणीपुरवठा प्रकल्प.)मा.मधुसुधन येनकर ( उपअभियंता पाणी पुरवठा प्रकल्प विभाग ) मा.मनोज चव्हाण (एल.अँड.टी. प्रोजेक्ट मॅनेजर) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या प्रसंगी मा.उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पार्टीचे नेते परशुराम मानकर, मा.अण्णा आठवले, मा.आप्पासाहेब वाडेकर, मा.नंदाताई निकाळजे मा.कल्याणी अष्टगे तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। या प्रकल्पामुळे आपल्या परिसरातील कायमचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

 

 

Exit mobile version