Site icon Jan Bharat Samachar

पुणे मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार –

Spread the love

पुणे. पुणे मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या मागणीसंदर्भात आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन सादर केले.या शिष्टमंडळात मा. परशुराम वाडेकर, मा. बाळासाहेब जानराव, मा. शैलेंद्र चव्हाण, मा. राहुल डंबाळे, मा. संजय सोनवणे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

या भेटीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्मारकाबाबत सकारात्मक भूमिका घेत शासनाच्या वतीने लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यापूर्वी शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांचीही भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनी देखील स्मारकाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता, मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याचे नमूद केले होते.

 

Exit mobile version