Site icon Jan Bharat Samachar

व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेचे १२ जूनपासून आयोजन !!

Spread the love
पुणे, ११ जूनः ब्रिजसँग ट्रेनिंग्स आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अ‍ॅकॅडमी यांच्या तर्फे ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ ते १७ जून या कालावधीमध्ये पुण्यातील कँप भागातील कॉनर्र पॉकेट स्नुकर अ‍ॅकॅडमी येथे होणार आहे. स्पर्धेत देशातील एकूण ७० हून अधिक स्नुकरपटू सहभागी झाले आहेत. वेनकॉब आणि नॅशनल एग कोऑर्डीनेशन कमिटी (एनईसीसी) हे स्पर्धेचे मुख्य प्रयोजक आहेत.
 
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे आयोजक ब्रिजसँग ट्रेनिंगचे अक्षय परामणे तसेच स्पर्धेचे संचालक आणि कॉनर्र पॉकेट स्नुकर अ‍ॅकॅडमीचे संचालक चिंतामणी जाधव म्हणाले की, या १०-रेड स्नुकर स्पर्धेत देशासह पुण्यातील अव्वल आणि मानांकित असे ७२ खेळाडू सहभागी होणार आहेत.  पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटना (पीडीबीएसए) यांच्या मान्यतेनी होणार्‍या या स्पर्धेत युवा आणि गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळणार आहे.
 
स्पर्धेला व्हेनकॉब आणि नॅशनल एग कोऑर्डीनेशन कमिटी (एनईसीसी) यांनी प्रायोजित केले आहे. याशिवाय अ‍ॅपेक्स्, पीएनएस क्लॉथ आणि टॉम चॉक्स्  यांनी स्पर्धेला पाठिंबा दिला आहे. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना १७ जून २०२५ रोजी होणार आहे. 
 
व्हेनकॉब आणि नॅशनल एग कोऑर्डीनेशन कमिटी (एनईसीसी) याच्या सहकार्याने पुण्यात पहिल्यांदाच महिला खेळाडूंसाठी विशेष राउंड फेरी ठेवण्यात आली आहे.
 
स्पर्धेत पुण्यातील मानांकित खेळाडू अभिजीत रानाडे, साद सय्यद, सुरज राठी तसेच राष्ट्रीय खेळाडू फैझल खान, हसन बदामी यांच्यासह पारस गुप्ता, हुसेन खान, विजय नचानी, शोएब खान, सोनु मातंग, अमरदीप घोडके, आरव संचेती, तहा खान आणि पिनाक अनाप आदि खेळाडू सहभागी झाले आहेत.
Exit mobile version