Site icon Jan Bharat Samachar

पहिली ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा !!

Spread the love

पुणे, १० जुनः ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने सलग दोन विजयांची नोंद केली. मुंबईच्या एसआरटी-टेन ग्लोबल अ‍ॅकॅडमीने पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सृजन सिद्धार्था याने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने एसआरटी-टेन ग्लोबल अ‍ॅकॅडमीचा ६३ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने १३५ धावांचे लक्ष्य उभे केले होते. याला उत्तर देताना एसआरटी-टेन ग्लोबल अ‍ॅकॅडमीचा डाव ७२ धावांवर गडगडला. तनिश पाटील याने ४१ धावांची खेळी केली. सृजन सिद्धार्था याने एकरा धावांमध्ये दोन गडी बाद केले. साई परदेशी याने तीन तर, अर्वयान शहा आणि रिवान रांगणेकर यांनी दोन गडी बाद करून संघाचा विजय साकार केला.

दुसर्‍या सामन्यामध्ये विवान देशमुख याने फटकावलेल्या ८० धावांच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने स्पोटर्स झोन अ‍ॅकॅडमीचा १०८ धावांनी सहज पराभव केला. विवान देशमुख याने ५१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ८० धावा चोपल्या. त्याला दुसर्‍या बाजूने इलिना त्यागी (४४ धावा) आणि अव्देत अमोंडकर (३२ धावा) यांनी सुरेख साथ दिली. यांच्या फलंदाजीमुळे क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने २०५ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानासमोर स्पोटर्स झोन अ‍ॅकॅडमीचा डाव ९७ धावांवर गडगडला. हर्ष अश्कानी याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एसआरटी-टेन ग्लोबल अ‍ॅकॅडमीने स्पोटर्स झोन अ‍ॅकॅडमीचा ४ गडी राखून पराभव केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १३५ धावा (अभिनव मुंढे २०, इलिना त्यागी १७, रिवान रांगणेकर १४, हर्ष अश्कानी २-८) वि.वि. एसआरटी-टेन ग्लोबल अ‍ॅकॅडमीः १८.१ षटकात १० गडी बाद ७२ धावा (तनिश पाटील ४१, सृजन सिद्धार्था २-११, अर्वयान शहा २-०, साई परदेशी ३-७, रिवान रांगणेकर २-१८); सामनावीरः सृजन सिद्धार्था;

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ४ गडी बाद २०५ धावा (विवान देशमुख ८० (५१, ११ चौकार, २ षटकार), इलिना त्यागी ४४, अव्देत अमोंडकर ३२, आदिती झेंडे १-२२);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी विवान आणि इलिना यांच्यात ११७ (७९) वि.वि. स्पोटर्स झोन अ‍ॅकॅडमीः २४.५ षटकात १० गडी बाद ९७ धावा (श्रवण धुमाळ १२, श्री गिरे ११, अर्वयान शहा २-७, सृजन सिद्धार्था २-१०, अर्णव रणदिवे २-१२); सामनावीरः विवान देशमुख;

स्पोटर्स झोन अ‍ॅकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद ८२ धावा (श्री गिरे १७, आदिती झेंडे नाबाद ११, हर्ष अश्कानी १-६, नव्यांश उपाध्याय १-१२) पराभूत वि. एसआरटी-टेन ग्लोबल अ‍ॅकॅडमीः १५.५ षटकात ६ गडी बाद ८४ धावा (तनिश पाटील नाबाद १९, हर्ष डोलास १०, आदिती झेंडे १-४, समर्थ भोपी १-१०); सामनावीरः हर्ष अश्कानी.

Exit mobile version