Jan Bharat Samachar

सामाजिक उपक्रमातून साजरा केलेला वाढदिवस सर्वोत्तम” – ना. चंद्रकांतदादा पाटील.

Spread the love

पुणे.माझाच वाढदिवस नव्हे तर कोणाचाही वाढदिवस किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग साजरा करताना त्याला समाजोपयोगी उपक्रमाची जोड दिली तर तो समारंभ अधिक आनंददायी होतो व आपला आनंद इतरांसोबत वाटल्याने त्याचे महत्व ही वाढते असे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन, ग्लोबल ग्रुप आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंग यांच्या वतीने आठवडाभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले.

यावेळी ग्राहक पेठेचे प्रमुख सूर्यकांत पाठक, नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर, नगरसेवक राजेश येनपुरे,वेध निसर्गोपचार व आयुर्वेदिक संशोधन केंद्राचे डॉ. अजय कुलकर्णी, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी,डेक्कन वरील स्वामी समर्थ मठाचे रामभाऊ दिघे,सौ. कल्याणी प्रतीक खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्राहक पेठ परिवार, महाराष्ट्र ब्राह्मण सभा व स्वामी समर्थ मठास स्पीकर सेट भेट देण्यात आला तर डॉ. अजय कुलकर्णी यांच्या निसर्ग व आयुर्वेदिक उपचार केंद्रास व्हीलचेयर भेट देण्यात आली.

ना. चंद्रकांतदादांची शिकवण ही “अधिकाधिक गरजुंना मदत करावी आणि समाजात जिथे जे कमी आहे ते यथाशक्ती भरून काढण्यासाठी कार्य करावे” अशी आहे आणि त्यास अनुसरूनच आम्ही वाटचाल करत आहोत असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. काही कार्यक्रम प्रकाशात येतात मात्र क्रिएटिव्ह चे कार्य अखंडित पणे सुरु असून अनेक सेवाभावी संस्थांना मदतीची गरज असते हे समजून घेऊन समाजातील दानशूरांनी आपले योगदान देत राहिले पाहिजे असेही खर्डेकर म्हणाले.

यावेळी डॉ.सचिन बोधनी यांनी भगवान परशुराम यांचा पुतळा भेट देऊन दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ.मंजुश्री खर्डेकर व सौ.कल्याणी प्रतीक खर्डेकर यांनी संयोजन केले.

Exit mobile version