Site icon Jan Bharat Samachar

व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा !!

Spread the love
पुणे . ब्रिजसँग ट्रेनिंग्स आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अ‍ॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत अभिषेक बोरा, खलिल अस्लम, वैभव मालखेडे, दर्शन गजभिये, रोहीत रावत आणि सिद्धांत फाटे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पुण्यातील कँप भागातील कॉनर्र पॉकेट स्नुकर अ‍ॅकॅडमी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत क्यु क्लबच्या अभिषेक बोरा याने क्यु स्टिक क्लबच्या अमित डहाळे याचा ३-१ असा पराभव करून विजयी सलामी दिली. पॉकेट्स क्लबच्या दर्शन गजभिये याने डेक्कन जिमखानाच्या सिद्धार्थ टेंभे याचा ३-१ असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला आणि पात्रता फेरीच्या दुसर्‍या चरणामध्ये प्रवेश केला.

क्यु कल्चरच्या चार खेळाडूंनी विजयी सलामी दिली. खलिल अस्लम याने रोड हाऊस स्नुकर क्लबच्या इलाही कारनेल याचा ३-० असा सहज पराभव केला. सिद्धांत फाटे याने कॉनर्र पॉकेट्सच्या सिनान मोतीवाला याचा ३-१ असा सहज पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये क्यु कल्चरच्या वैभव मालखेडे याने रॉयल स्नुकर क्लबच्या तोसिफ पिरोश याचा ५५-२१, ४५-१८, ११-४९, १३-५१, ४८-३२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. क्यु कल्चरच्यचा रोहीत रावत याने रोड हाऊस स्नुकर क्लबच्या गौरव कामठे याचा ४७-१९, ०९-३४, ११-४७, ५४-३१, ५६-२७ असा संघर्षपूर्ण पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला. स्पर्धेचे उद्घाटन ब्रिजसँग टे्रनिंग्सचे अक्षय परामणे आणि स्पर्धेचे संचालक आणि कॉनर्र पॉकेट स्नुकर अ‍ॅकॅडमीचे संचालक चिंतामणी जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी सहभागी खेळाडू आणि स्पर्धेचे रेफ्री आदि मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकालः पहिली पात्रता फेरीः
अभिषेक बोरा (क्यु क्लब) वि.वि. अमित डहाळे (क्यु स्टिक क्लब) ३-१ (५५-३२, २१-४४, ४६-२६, ५७-३८);
खलिल अस्लम (क्यु कल्चर) वि.वि. इलाही कारनेल (रोड हाऊस स्नुकर क्लब) ३-० (४८-१९, ५०-३१, ५३-३४);
वैभव मालखेडे (क्यु कल्चर) वि.वि. तोसिफ पिरोश (रॉयल स्नुकर क्लब) ३-२ (५५-२१, ४५-१८, ११-४९, १३-५१, ४८-३२);
दर्शन गजभिये (पॉकेट्स क्लब) वि.वि. सिद्धार्थ टेंभे (डेक्कन जिमखाना) ३-१ (५९-३३, २१-४७, ४५-२८, ५२-३१);
रोहीत रावत (क्यु कल्चर) वि.वि. गौरव कामठे (रोड हाऊस स्नुकर) ३-२ (४७-१९, ०९-३४, ११-४७, ५४-३१, ५६-२७);
सिद्धांत फाटे (क्यु कल्चर) वि.वि. सिनान मोतीवाला (कॉनर्र पॉकेट्स) ३-१ (४६-१३, ११-३८, ५०-१४, ५१-२७);

Exit mobile version