Site icon Jan Bharat Samachar

पहिली ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा !!

Spread the love
पुणे,  ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी अ संघ आणि पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी अनुक्रमे साई एमजे स्पोटर्स अ‍ॅकॅडमी आणि घुले क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथमेश शिंदे याने केलेल्या अष्टपैलु कामगिरीमुळे पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने घुले अ‍ॅकॅडमीचा १ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना घुले क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २५ षटकात ११५ धावांचे लक्ष्य उभे केले. समर्थराज घुले याने ३१ धावांची आणि रूद्राक्ष के. याने २४ धावांची खेळी केली. प्रथमेश शिंदे याने नऊ धावांत तीन गडी बाद केले. हे लक्ष्य पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २४.३ षटकात व ९ गडी गमावून पूर्ण केले. संघाच्या विजयामध्ये स्वराज पिसाळ (२६ धावा), प्रथमेश शिंदे (२२ धावा) आणि अर्णव घाटे (१६ धावा) यांनी योगदान दिले.

स्टिफन शिरोडकर याने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी अ संघाने साई एमजे स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा ७९ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने २३.४ षटकामध्ये १२१ धावा धावफलकावर लावल्या. संघाचा डाव बांधताना स्वर नागवडे (२० धावा), प्रणय आवळे (१७ धावा), स्वराज मोरे (१४ धावा) आणि विराट भिसे (११ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. आदित्य घडाशी याने २१ धावांत ४ गडी बाद केले. याला उत्तर देताना साई एमजे स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा डाव ४२ धावांवर गडगडला. स्टिफन शिरोडकर याने चार षटके गोलंदाजी करताना दोन षटके निर्धाव टाकताना दोन धावांत दोन गडी बाद केले. स्वराज मोरे आणि शौर्य शेलार यांनीही चमकदार गोलंदाजी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
घुले क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद ११५ धावा (समर्थराज घुले ३१, रूद्राक्ष के. २४, प्रथमेश शिंदे ३-९, अर्णव घाटे २-१३) पराभूत वि. पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४.३ षटकात ९ गडी बाद ११७ धावा (स्वराज पिसाळ २६, प्रथमेश शिंदे २२, अर्णव घाटे १६, समर्थराज घुले ३-१६, पुष्कराज गावडे २-२२); सामनावीरः प्रथमेश शिंदे;

ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी अः २३.४ षटकात १० गडी बाद १२१ धावा (स्वर नागवडे २०, प्रणय आवळे १७, स्वराज मोरे १४, विराट भिसे ११, आदित्य घडाशी ४-२१, युग जाधव १-१७) वि.वि. साई एमजे स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः १६.४ षटकात १० गडी बाद ४२ धावा (रूद्र भराम १३, स्वराज मोरे ३-१०, स्टिफन शिरोडकर २-२, शौर्य शेलार २-७); सामनावीरः स्टिफन शिरोडकर.

Exit mobile version