Site icon Jan Bharat Samachar

आळंदी नगरपरिषद शाळांत नवोगत विद्यार्थ्याचे स्वागत प्रवेशोत्सव उत्साहात

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वार्ताहर : येथील आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक एक ते चार मध्ये शालेय वर्षाचे पहिल्या दिवशी सोमवारी ( दि. १६ ) शालेय स्तरावर मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे प्रमुख उपस्थितीत नवागतांचे स्वागत, प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षण विभागाचे शाळा क्रमांक १ चे १७ शिक्षक व ९१ विद्यार्थी, शाळा क्रमांक २ मधील ६ शिक्षक व ३२ विद्यार्थी, शाळा क्रमांक ३ चे ११ शिक्षक व ४३ विद्यार्थी व शाळा क्रमांक ४ चे ११ शिक्षक व ७७ विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते पाठ्य पुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळेत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रत्यक्ष भेटी देत संवाद साधला. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. शिक्षकांना गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध नावीन्य पूर्ण उपक्रम राबविण्यास सांगितले. शालेय मुलांचे कला गुणांना वाव देण्यास प्रयत्नशील रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version