Jan Bharat Samachar

आळंदीत पालखी सोहळ्यासाठी पंचायत समिती खेड आरोग्य विभाग सज्ज आळंदी ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खेड पंचायत समिती आरोग्य विभाग आळंदीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यास आलेल्या वारकरी भाविकांचे तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सज्ज झाला आहे. आषाढी यात्रा सोहळा अंतर्गत आरोग्य विषयक प्रतिबंध व उपाय योजना सुविधांसाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी पूर्ण केली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली.
उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. आळंदी शहराचे १३ भागांमध्ये विभागणी व भाग निहाय हॉटेल तपासणी, टँकर तपासणी, धर्मशाळा व सर्व पाणी स्रोत यांचे तपासणीसाठी १३ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. सार्वजनिक पाणी स्रोतांची तपासणी पूर्ण झालेली असून सर्व स्रोत तपासणी नुसार पिण्यास योग्य आहेत. हिवताप व डेंग्यू यांसारखे आजार होऊ नयेत यासाठी डास अळ्या असलेले पाणी साठे व भांड्यांचा शोध घेऊन ती मोकळी करण्यात येत आहेत. सर्व पिण्याच्या पाण्याचे क्लोरीनेशन करण्यात येत आहे. यासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.


पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे मार्फत आळंदी शहरात एकूण १३ आरोग्य पथके तैनात आहेत. १० पेक्षा अधिक रुग्णवाहिका रुग्णांची ने आण करण्यास सज्ज करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभागा कडून पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी उत्साहाने माऊलीच्या सेवेसाठी कार्यरत झाले आहेत. थोरवे विहीर येथे देखील विहीर शुद्धीकरण तपासणी करतांना आरोग्य पथक सेवेत होते. येथील आळंदी ग्रामीण रुग्णालय देखील भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सज्ज झाले आहे. पुरेशा प्रमाणात औषध साठा, कर्मचारी उपलब्ध असून आरोग्य सेवा भाविकांचे स्वागत तसेच आरोग्य सेवेस सज्ज झाली असल्याचे आरोग्य विभाग अंतर्गत आळंदी ग्रामीण रुग्णालय देखील कार्यरत झाले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले. यात आंतररुग्ण , बाह्यरुग्ण विभागात देखील सज्ज ठेवण्यात आला आहे. २४ तास आरोग्य सेवा भाविक, नागरिकांचे साठी दक्ष रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी पुरेहसा प्रमाणात स्टाफ देखील उपलब्ध झाला असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले

Exit mobile version