Site icon Jan Bharat Samachar

बेकायदेशीर दस्त नोंदणी, भ्रष्ट कारभाराविरुद्ध ‘जवाब दो’आंदोलन

Spread the love

पुणे : सह-दुय्यम निबंधक हवेली क्र.२० मधील बेकायदेशीर दस्त नोंदणी, भ्रष्ट कारभाराविरुद्ध लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षा ने आज १८ जून २०२५ रोजी सायंकाळी  ‘जवाब दो’आंदोलन करण्यात केले.हवेली क्र.२० चे अधिकारी सह-दुय्यम निबंधक पोपटराव भोई  यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करणे बाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य शासकीय इमारत यांच्या कार्यालयासमोर(कौन्सिल हॉल समोरील नवीन प्रशासकीय इमारत येथे)  ढोल वाजवून ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.

 

ग्रामपंचायत परवानग्या असलेल्या इमारतींमधील दस्त बेकायदेशीर रित्या नोंदवून बिल्डर लॉबी चे भले करण्यात आल्याचा आरोप यावेळी बोलताना पक्षाचे शहर,जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी केला.या कार्यालयातील दस्तांची निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून चौकशी करावी ,दस्त नोंदणी तपासणी पथकाची देखील खातेनिहाय चौकशी करावी ,अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी ,फौजदारी कारवाई करावी अशा मागण्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूल मंत्री,नोंदणी महानिरीक्षक आणि सह जिल्हा निबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१४ ते १ ऑक्टोबर २०२४ काळातील दस्त नोंदणी बेकायदेशीर रित्या झाल्याचा आरोप पक्षाने निवेदनात केला आहे.

 

यावेळी  संजय आल्हाट यांच्यासमवेत के.सी.पवार,कल्पना जावळे,पन्ना शेट्टी कुडेकर,अभिजित पाटील,नारायण भिसे,राहुल उभे,कुसुम दहिरे,योगिता साळवे , रणजीत सोनावळे. बंडू वाघमारे अक्का साबळे राम आल्हाट बाजीराव कुराडे. जयवंत कांबळे. विजय आठवल.प्रवीण बनसोडे गणेश भोसले आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते

 

 

*

Exit mobile version