Site icon Jan Bharat Samachar

योगा हा धार्मिक व राष्ट्रीय सीमा ओलांडणारी वैश्विक चळववळ 

Spread the love

पुणे, २१ जूनः अंर्तमनाच्या जगाची ओळख देणारे ज्ञान म्हणजे योग साधना आहे. हवामान बदल, साथीचे रोग आणि जीवनशैलीची संबंधित आजारांसारख्या आव्हानांशी झुंजत असलेल्या जगात योग मानसिक शांती, शारीरिक कल्याण आणि पर्यावरणीय जबाबदारीची भावना कशी वाढवू शकते हे महत्वाचे आहे. योगा हा सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय सीमा ओलांडणारी जागतिक चळवळ बनली आहे. असे विचार गुरूजी शिवम यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ११ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग महोत्सवाचे आयोजन केले. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योगा या दिवसाच्या थीमवर भर देण्यात आला.

या प्रसंगी विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे उपस्थित होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, माईर्सचे रजिस्टार डॉ. रत्नदीप जोशी व स्कूल ऑफ पीस स्टडीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.

या प्रसंगी शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना योगाचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याचे ज्ञान योगसाधनेतून मिळते. यातून नम्रता, लिनता आत्मसात येते. शरीराचा कण कण गंजण्यापेक्षा झिझणे बरे त्यासाठी रोज योगसाधना करावी. योग साधनेतून स्वत्व, स्वधर्म आणि स्वाभिमान जागृत करता येतो. आज संपूर्ण विश्वाला शांतीची गरज असून ती ध्यान धारणेतूनच येईल. त्यासाठी एमआयटीत स्थापन झालेली आध्यात्मिक प्रयोगशाळा ही संपूर्ण जगासमोर ठेवायची आहे.

डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, एमआयटीत ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात करू. येथे नित्य नियमाने योगासने घेणारी ही एकमेव संस्था आहे. प्रा.डॉ. शालिनी टोंपे यांनी सूंत्रसंचालन केले.

 

Exit mobile version