Jan Bharat Samachar

विठू माऊलीच्या गजरात किर्तन, मोफत औषधे वैद्यकीय उपचार सोहळा आंबेगाव खुर्द येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

Spread the love

पुणे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी ही पुण्यामध्ये मुक्कामी असते. पालखी सोहळ्यामध्ये वारकरी मोठ्या संख्येने पुण्यामध्ये दाखल होत असतात. पाई चालत आलेले वारकरी पुण्यामध्ये जेव्हा दाखल होतात तेव्हा संपूर्ण पुणे भक्तीमय होऊन जाते. वारकरी संप्रदायातील लोकांसाठी अनेक सेवा या पुणेकरांकडून पुरवल्या जातात अशीच एक सेवा स्वराज्य नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष प्रशांत कांबळे आणि आम आदमी पार्टी तर्फे वैद्यकीय सेवा मोफत उपचार राबवण्यात आला. सनातन बहुजन महासंघ शहराध्यक्ष श्रीराम शेंबडे, यांच्यातर्फे कीर्तन सोहळ्याचे, अन्नदान आयोजन करण्यात आले होते.

सच्चाई माता परिसरातील नागरिक किर्तन सोहळ्यामध्ये विठू माऊलीच्या गजरामध्ये भक्तिमय मिलीन होऊन कारेक्रम पार पडला. त्यावेळेस कीर्तनकार तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांच्या कीर्तनात नागरिक भक्तिमय झाले. वैद्यकीय उपचार सेवा डॉ. निरंजन मोरे, डॉ. आसावरी कुलकर्णी तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले. त्यावेळेस लक्ष्मण केकन, विशाल ताठे. शुभम भोसले, उदय नगरकर, पांडुरंग चोपडे, जीवन कोळेकर, विष्णू मुंडे, प्रणव डोरखडे, अमरदीप केकन, आबा चोपडे, दिपाली शेंबडे यदी मोठे संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version