Site icon Jan Bharat Samachar

आज पासून ‘वारी’ च्या वाटेवरील गावांमध्ये मद्य-मांस विक्री बंद 

Spread the love

आचार्य तुषार भोसले यांच्या मागणीला यश

 

आचार्य तुषार भोसलेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील संतांचे पालखी सोहळे ज्या मार्गाने जातील त्या गावांमध्ये तो संपूर्ण दिवस मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी तसेच यात्रा कालावधीत पंढरपूर परिक्षेत्रात मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी आणि व्हीआयपी वाहनांना तीर्थक्षेत्रात सोहळ्याचे कालावधीत बंदी घालण्यात यावी अशा तीन मागण्या भाजपा आध्यात्मिक आघाडी चे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या.

आचार्य तुषार भोसले यांनी केलेल्या त्या सर्व तीन ही मागण्या तात्काळ मान्य केल्या. या मागण्यांचे अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता प्रशासनाने आज पासून अंमलबजावणी सुरु केली आहे.

Exit mobile version