Site icon Jan Bharat Samachar

ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन

Spread the love

पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ काशिनाथ माळवे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने दु;खद निधन झाले. दै. विशालसह्याद्री मधून त्यांची पत्रकारितेची सुरवात झाली. त्यानंतर दीर्घकाळ दै.प्रभातचे मुख्य उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘दै प्रभात मध्ये अनेक सदरांचे लिखाण ते करायचे. सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दै. प्रभातमधील ‘पाठीवर थाप पडलीच पाहिजे’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. त्यांच्या योगदानाबद्दल पत्रकारितेतील महाराष्ट्र भूषण, पुणे रत्न अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले. नुकताच १५ मे रोजी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कात्रज स्मशानभूमीत सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदि विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

Exit mobile version