Site icon Jan Bharat Samachar

पुणे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शाहू महाराजांचे नाव ठेवावे आप चे प्रशांत कांबळे यांची मागणी

Spread the love

 

 

पुणे .पुणे स्टेशनचे नाव बदलण्यात यावे विविध पक्ष यांची मागणी आता जोर धरू लागली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीच्या निमित्ताने आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी केली आहे. शाहू महाराजांवरती महाराष्ट्रामध्ये राजकारण करून सत्ता मिळवली परंतु आत्तापर्यंत पुणे शहरांमध्ये त्यांचे कुठेही भव्य स्मारक पुतळा उभारण्यात आलेला नाही. पुणे स्टेशनचे नाव बदलून काहीही होणार नाही. पुणे शहराच्या दृष्टीने त्या स्टेशनचे नाव पुणे हे योग्यच आहे.

परंतु काही जातीवादी धर्मवादी हिंदी भाषेपासून भरकवटण्याचा प्रयत्न काही लोक करताना दिसतात. निवडणूक आली की जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा. असं कुठेतरी जाती धर्माचं राजकारण करून लोकांना भरकवटात.

पुण्यामध्ये अनेक समस्या असताना देखील त्या कुठे सोडवताना हे धर्मवादी दिसत नाही. जर पुणे स्टेशनचे नाव बदलीच करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, संत कबीर, लहुजी वस्ताद साळवे ही महापुरुषांची नावे का देऊ नये नाव बदली करून काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा मराठी शाळा वाचवा नागरिकांच्या अनेक समस्या सोडवा अशी आम आदमी पार्टी कडून मागणी होत आहे.

Exit mobile version