Site icon Jan Bharat Samachar

एनएससीबीएमएस, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलला जेतेपद

Spread the love
पुणे, २७ जून: नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, फुलगाव आणि एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली यांनी प्रत्येकी एक विजेतेपद पटकावत एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली कृत्रिम टर्फ येथे शुक्रवारी झालेल्या एसएनबीपी इंटरनॅशनल जिल्हास्तरीय क्रीडा अजिंक्यपद २०२५-२६ स्पर्धेत आश्वासक सुरुवात केली.
१०, १२ आणि १४ वर्षांखालील मुले गटाच्या अंतिम फेरीत नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, पुलगाव संघाने १२ आणि १४ वर्षांखालील गटात बाजी मारली.
१० वर्षांखालील गटात त्यांनी एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलला एका गोलच्या फरकाने (१-०) हरवले. एकमेव आणि विजयी गोल शिवांश कुमारने (तिसऱ्या मिनिटाला) केला.
१२ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल (एनएससीबीएमएस) आणि यजमान संघाच्या एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली संघाने प्रतिस्पर्धी संघावर २-० अशी मात केली. १२ वर्षांखालील गटात, एनएससीबीएमएसने वापा टिका (७ व्या मिनिटाला) आणि कार्तिक कुमारच्या (१९ व्या मिनिटाला) गोलच्या जोरावर जेतेपदावर नाव कोरले. १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत एनएससीबीएमएसने वर्चस्व गाजवले. त्यात सिझो मालियो (७ व्या मिनिटाला) आणि मंकाई वालिम (२३ व्या मिनिटाला) यांचे गोल निर्णायक ठरले.
या स्पर्धेत एकूण ४० शाळांनी १०, १२, १४ आणि १७ वर्षांखालील गटात मुले तसेच १७ वर्षांखालील गटात मुली अशा चार वयोगटात भाग घेतला,
निकाल:
१० वर्षांखालील मुले:
पहिली उपांत्य फेरी: विबग्योर शाळा बालेवाडी: २(थारक श्री बालाजी ८वे, २५वे) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरेवाडी: ०.
दुसरी उपांत्य फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल चिखली: १ (रुद्र शिंदे १८वे) विजयी वि. विबग्योर स्कूल, चिंचवड: ०.
अंतिम फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल चिकली: १ (शिवंशकुमार १३वे) विजयी वि. विबग्योर स्कूल बालेवाडी: ०
१२ वर्षांखालील मुले:
पहिली उपांत्य फेरी: नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल: १(श्रेयस कुमार) विजयी वि. अकादमी स्कूल: ०
दुसरी उपांत्य फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल चिखली: १(अर्णव जाधव १७वे) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, येरवडा: ०
अंतिम फेरी: नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगाव: २ (वापा टिका ७वे, कार्तिक कुमार १९वे) विजयी वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल चिखली: ०
१४ वर्षांखालील मुले:
पहिली उपांत्य फेरी: एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिखली: २(सोहम गुरव ५वे, २३वे) विजयी वि. द अकॅडमी स्कूल: ०
दुसरी उपांत्य फेरी: नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, पुलगाव: २ (मानकाई वालीम २०वे) विजयी वि. एसएनबीपी मोरेवाडी: ०
अंतिम फेरी: नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, पुलगाव: २(सिझो मालीओ ७वे, माणकाई वालीम २३वे) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, चिखली:०
Exit mobile version