Site icon Jan Bharat Samachar

मेळा मनोरंजनाचा’ कायक्रमामुळे पिंपरी चिंचवडकरांची १ जुलैची संध्याकाळ बनणार खास

Spread the love

पिंपरी चिंचवड मध्ये ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रमात घुमणार अवधूत गुप्तेचा बुलंद आवाज

पुणे, दि. २७ जून – पिंपरी चिंचवडकरांची जुलै महिन्याची सुरुवात ‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ या कार्यक्रमामुळे दणक्यात होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचा रॉकस्टार अवधूत गुप्ते, अभिनय क्षेत्रातील हरहुन्नरी अभिनेता पुष्कर श्रोत्री, अभिनय बेर्डे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, जान्हवी किल्लेकर याचसह बऱ्याच दिग्गज कलाकारांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. ‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी, पिंपरी चिंचवड येथे पार पडणार आहे. प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘सन मराठी’चा हा खास कार्यक्रम आता पिंपरी चिंचवड मध्ये पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता पुष्कर श्रोत्री करणार असून, महाराष्ट्राचा लाडका गायक अवधूत गुप्तेच्या ठसकेबाज गाण्यांची जिवंत मैफिल प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याच्या लोकप्रिय गाण्यांवर पुणेकर नक्कीच थिरकणार. कार्यक्रमात प्रेक्षकांना नृत्य, संगीत आणि हास्य यांचा मनमुराद अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर ‘सन मराठी’च्या लोकप्रिय कलाकारांशी थेट संवाद, त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे. 

 

या रंगतदार कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची मनमोहक अदा, संस्कृती बालगुडेचा जबरदस्त डान्स, चार्मिंग बॉय अभिनेता अभिनय बेर्डेचा स्टायलिश डान्स परफॉर्मन्स, आणि गायिका मुग्धा गराडेच्या सुरेल गाण्यांची जादू प्रेक्षकांना अनुभवता येईल. हास्याचा तडका लावण्यासाठी स्टँडअप कॉमेडियन तृप्ती खामकर देखील मंचावर रंगत आणणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे ‘सन मराठी’वरील आगामी मालिका ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ मधील तेजा आणि वैदहीचा खास रोमँटिक डान्स परफॉर्मन्स देखील सादर केला जाणार आहे. या सुंदर सादरीकरणाने संपूर्ण वातावरण रोमँटिक होईल एवढं नक्की. या अश्या बहारदार परफॉर्मन्सने ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणा

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, जागा मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. ही बातमी किंवा त्याचा फोटो पास म्हणून दाखवून प्रवेश मिळू शकतो.चला तर मग, संपूर्ण कुटुंबासह या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हा आणि १ जुलै २०२५ ची संध्याकाळ खास बनवा, कलाकारांच्या संगतीने सजलेली, आणि आठवणीत राहणारी खास सांस्कृतिक मेजवानी!

Exit mobile version