
सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कृष्णा गायकवाड याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर विजय अॅकॅडमीने अष्टपैलु स्पोटर्सचा ६ गडी राखून पराभव करत विजयांची हॅट्ट्रीक नोंदवली. पहिल्यांदा फलंदाजी करणार्या अष्टपैलु स्पोटर्सचा डाव केवळ ९८ धावांवर गडगडला. संघाकडून एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. विजय अॅकॅडमीच्या कृष्णा गायकवाड याने २३ धावांमध्ये ३ गडी टिपत अष्टपैलु संघाच्या डावाला खिंडार पाडले. शौर्य जाधव आणि अर्णव आगाशे या दोघांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य विजय क्रिकेट अॅकॅडमीने ४ गडी गमावून पूर्ण केले. आर्यन कित्तुरे याने ३२ धावांची आणि यशराज सोळंके याने २१ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.
विहान परब याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे क्रिक९ अॅकॅडमीने धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमीचा १८ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा खेळणार्या क्रिक९ अॅकॅडमीने १७३ धावांचे लक्ष्य उभे केले. श्रेय असलेकर याने ५९ धावांची खेळी केली. विहान परब (३८ धावा) आणि सर्वेश नेहेरे (२३ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा डाव बांधला. या लक्ष्यासमोर धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १५५ धावांवर मर्यादित राहीला. राजवीर जाधव याने ६६ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला. विहान परब याने दोन गडी बाद करून गोलंदाजीमध्येसुद्धा हातभार लावला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
अष्टपैलु स्पोटर्सः २० षटकात १० गडी बाद ९८ धावा (तेजस शेलार १३, महेश चौधरी १२, कृष्णा गायकवाड ३-२३, शौर्य जाधव २-१५, अर्णव आगाशे २-१६) पराभूत वि. विजय क्रिकेट अॅकॅडमीः १९.२ षटकात ४ गडी बाद १०२ धावा (आर्यन कित्तुरे ३२, यशराज सोळंके २१, अनिश डाबळे २-१८); सामनावीरः कृष्णा गायकवाड;
क्रिक९ अॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १७३ धावा (श्रेय असलेकर ५९ (३३, ११ चौकार), विहान परब ३८, सर्वेश नेहेरे २३, राजवीर जाधव ४-१६) वि.वि. धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद १५५ धावा (राजवीर जाधव ६६ (४५, ९ चौकार, २ षटकार), श्रेय वाघमोडे २३, अर्घ्य मानेरीकर २०, विहान परब २-३०); सामनावीरः विहान परब.