आळंदी मल्टीटेकच्या विद्यार्थ्यांनी बनवले थेम्स एमएस-सीआयटी म्हणजे केवळ बेसिक नव्हे

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) . महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी एमएस-सीआयटी कोर्स शिकवला जातो, परंतु आळंदी येथील मल्टीटेक कॉम्प्युटर सेंटरने आपल्या विद्यार्थ्यांना केवळ बेसिक संगणक शिक्षण देण्यापली कडे जाऊन, थेट “कॉम्प्युटर गेम डेव्हलपमेंट” सारख्या इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतल्याने, संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळाच प्रेरणादायी आदर्श निर्माण केले आहे.
“कॉम्प्युटर गेम क्रिएशन स्पर्धा”च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन मल्टीटेक कॉम्प्युटर आळंदीत उत्साहात झाले. या कार्यक्रमात फक्त एमएस-सीआयटी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीच सहभाग घेतला होता आणि त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने थ्रीडी, HTML, अॅनिमेशन इ. तंत्रज्ञान वापरून गेम्स तयार केले.
या प्रसंगी शिवव्याख्याते संदीप तापकीर यांनी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिवाजी महाराजां प्रमाणेच आजच्या तरुणांनी सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता आत्मसात केली पाहिजे.”
डॉ. पांडुरंग मिसाळ, प्राचार्य, शरदचंद्र पवार महाविद्यालय, यांनी सांगितले की, “एमएस-सीआयटी हा कोर्स फक्त संगणकाचे प्राथमिक ज्ञान देणारा नसून, जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यातून डिजिटल उद्योजक घडू शकतात.”
IGW कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर आणि मल्टीटेकचे माजी विद्यार्थी शिवाजी सुरशे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, “मीही एमएस-सीआयटी करत असताना बेसिक पासून सुरुवात केली होती. पण सातत्य आणि मेहनतीने मॅनेजर पदावर पोहोचता येते.”
या स्पर्धेत १५० एमएस-सीआयटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे अशी:
अथर्व मिंडे, भक्ती मिसाळ, रेणुका तळपे, गौरव गीते, गुरुराज साठे, हर्षद सुरवसे, करन आंबुरे, कृष्णकली मांडगे, पार्थ गुरव, प्रणाली घावरे, प्रसाद पोपुले, प्रीती कारले, सपना दहातोंडे, सार्थक कदम, शुभम घुटाळ, स्नेहा सावंत, सोमनाथ कसबे, वेदांत मीरधे, पृथ्वीराज मस्के या सर्व विद्यार्थ्यांनी एमएस-सीआयटी शिकत असतानाच गेम डेव्हलपमेंटमध्ये झेप घेतली. काहींनी HTML व थ्रीडीचा वापर करत अॅडव्हान्स लेव्हलचे गेम्स सादर केले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अधिक उजळून निघाल्याचे
संस्थेचे मुख्य समन्वयक सचिन थोरवे यांनी सांगितले, “आमचा उद्देश हा आहे की एमएस-सीआयटी हा फक्त परीक्षा पास होण्यासाठी न शिकवता, तो एक इनोव्हेटिव्ह आणि स्किल-बेस्ड शिक्षणाचा माध्यम व्हावा. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संचालिका स्वाती थोरवे, मुख्य प्रशिक्षक रूपाली मॅडम, आणि प्रशिक्षक विश्वजीत बघे यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रात एमएस-सीआयटी कोर्स शिकवणारी सुमारे ५००० केंद्रे असली तरी, मल्टीटेक कॉम्प्युटर, आळंदी हे केंद्र विद्यार्थ्यांना गेम डेव्हलपमेंटसारख्या अत्याधुनिक कौशल्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. “मल्टीटेक कॉम्प्युटर, आळंदीच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आमच्या एमएस-सीआयटी विद्यार्थ्यांनी थेट गेम डेव्हलपमेंटमध्ये झेप घेतली. शिकत असताना स्वतःचे गेम तयार करणं हीच खरी प्रगती आणि Proud Moment! असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाती थोरवे यांनी आभार मानले. पसायदानाने पारितोषिक वितरण समारंभाची सांगता झाली.