व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा !!
साद सय्यद, तहा खान, आरव संचेती, महेंद्र चौहान, इम्रान खान, जेसन मल्होत्रा, फैझल खान, विजय नचानी यांचा उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश !!

पुणे, १६ जूनः ब्रिजसँग टे्रनिंग्ज आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचे साद सय्यद, तहा खान, आरव संचेती यांच्यासह मध्यप्रदेशचे महेंद्र चौहान आणि इम्रान खान, दिल्लीचा जेसन मल्होत्रा, मुंबईचे फैझल खान आणि विजय नचानी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उप-उपांत्यपुर्व फेरीमध्ये प्रवेश केला.
पुण्यातील कँप भागातील कॉनर्र पॉकेट स्नुकर अॅकॅडमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या दुसर्या फेरीमध्ये कॉर्नर पॉकेट्सच्या साद सय्यद याने बंगलोरच्या आदित्य राजावत याचा ५४-२१, २१-४९, ५२-३२, ५६-३८, ४९-१३ असा पराभव केला. कॉर्नर पॉकेट्चा आणखी एक खेळाडू, तहा खान याने स्नुकर प्लॅनेटच्या हुझेफ खान याचा ४३-२१, ४८-२९, ५०-३२, ६१-३२ असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. मध्यप्रदेशच्या महेंद्र चौहान याने पॉकेट क्लबच्या नितेश माने याचा ५४-२१, ४५-३२, ४९-३१, ३८-२४ असा सहज पराभव करून आगेकूच केली.
चुरशीच्या झालेल्या सामन्यात दिल्लीच्या जेसन मल्होत्रा याने क्यु क्लबच्या कैवल्य जाधव याचा ११-४१, ३९-२८, ४५-३२, २८-५४, ५६-३२, २१-५०, ६०-१० असा पराभव केला. मुंबईच्या विजय नचानी याने मुंबईचाच खेळाडू अनुज अगरवाल याचा ५४-२१, ३१-५८, १२-४६, ४९-२८, ४८-३७, २१-५६, ५८-३५ असा संघर्षपूर्ण पराभव केला. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या अभिजीत रानाडे याने एस लाऊंज स्नुकर क्लबचा सुमित नायडू याचा ४५-३१, ११-४८, ५६-३७, ३१-५८, ५०-३१, ३१-४५, ४८-३६ असा पराभव करून आगेकूच केली.
इम्रान खान, हुसेन खान, युवा खेळाडू आरव संचेती, पारस गुप्ता, मुंबईचा फैजन खान आणि सुमित अहूजा, पुना क्लबचा सुरज राठी, पिनाक अनाप, सोनु मातंग, महेश जगदाळे यांनीसुद्धा आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः दुसर्या फेरीः
महेंद्र चौहान (मध्यप्रदेश) वि.वि. नितेश माने (पॉकेट क्लब) ४-० (५४-२१, ४५-३२, ४९-३१, ३८-२४);
जेसन मल्होत्रा (दिल्ली) वि.वि. कैवल्य जाधव (क्यु क्लब) ४-३ (११-४१, ३९-२८, ४५-३२, २८-५४, ५६-३२, २१-५०, ६०-१०);
साद सय्यद (कॉर्नर पॉकेट्स) वि.वि. आदित्य राजावत (बंगलोर) ४-१ (५४-२१, २१-४९, ५२-३२, ५६-३८, ४९-१३);
इम्रान खान (मध्यप्रदेश) वि.वि. संकेत मुथा (स्नुकर क्लब) ४-१ (५७-३२, १३-४७, ४९-२९, ४१-२१, ५०-२३);
अभिजीत रानाडे (पीवायसी हिंदू जिमखाना) वि.वि. सुमित नायडू (एस लाऊंज स्नुकर क्लब) ४-३ (४५-३१, ११-४८, ५६-३७, ३१-५८, ५०-३१, ३१-४५, ४८-३६);
हुसेन खान (मध्यप्रदेश) वि.वि. प्रसाद गुज्जर (स्नुकर क्लब) ४-० (४५-२१, ५६-३२, ५९-३७, ५५-३१);
आरव संचेती (अमानोरा क्लब) वि.वि. शौकिन खान (क्यु क्लब) ४-२ (२१-४८, ५१-३२, २१-५६, ५३-२६, ५८-३८, ४९-२७);
पारस गुप्ता (आग्रा) वि.वि. सिद्धांत फाटे (क्यु कल्चर) ४-२ (५६-३१, ३१-४८, २५-४९, ५९-३१, ४८-३५, ५१-३९);
तहा खान (कॉर्नर पॉकेट्स) वि.वि. हुझेफ खान (स्नुकर प्लॅनेट) ४-० (४३-२१, ४८-२९, ५०-३२, ६१-३२);
फैझल खान (मुंबई) वि.वि. वैभव मालखेडे (क्यु कल्चर) ४-१ (११-४६, ५१-२१, ५९-३२, ४९-२१, ५३-३७);
सुरज राठी (पुना क्लब) वि.वि. पार्थ शहा (स्नुकर क्लब) ४-२ (६१-२६, ३१-४५, ५२-१७, २८-४३, ५८-३१, ५३-३८);
विजय नचानी (मुंबई) वि.वि. अनुज अगरवाल (मुंबई) ४-३ (५४-२१, ३१-५८, १२-४६, ४९-२८, ४८-३७, २१-५६, ५८-३५);
सुमित अहुजा (मुंबई) वि.वि. अमरदीप घोडके (क्यु क्लब) ४-२ (५४-२१, ११-३३, ४९-३२, २१-४७, ५२-३२, ५७-३९);
पिनाक अनाप (कॉर्नर पॉकेट्स) वि.वि. अन्वर गाझी (मुंबई) ४-१ (४९-१२, १६-४८, ५१-२८, ४८-२८, ५१-२९);
सोनु मातंग (क्यु क्लब) वि.वि. ओस्वाल्ड मासी (गुजरात) ४-१ (५२-३१, २१-४८, ४९-३१, ५१-२८, ५०-३२);
महेश जगदाळे (स्नुकर क्लब) वि.वि. अभिषेक बोरा (क्यु क्लब) ४-२ (११-३२, ४८-२७, २१-५२, ५९-३२, ४३-२४, ५१-३८).