भावी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांना माध्यमातून हजारो भाविकांना महाकालेश्वर उज्जैन दर्शन घडले
म्हाळुंगे नानेकर जिल्हा परिषद गट परिसरातील नागरिकांचा सहभाग

खेड प्रतिनिधी .(बद्रीनारायण घुगे ).गणेश बोत्रे आणि अश्विनी सोमनाथ तरस यांच्या माध्यमातून १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली भव्य मोफत महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रा भक्ती, उत्साह आणि सेवाभावाच्या वातावरणात सुरू आहे. या यात्रेत एकूण ३००० पुरुष व महिला भाविकांनी सहभागी होऊन महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहे.
यात्रेच्या शुभारंभापूर्वी रेल्वे पूजन आणि यात्रा पूजन हा शुभ विधी खेड-आळंदी चे माजी आमदार मा.श्री.दिलीप मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाला. पूजनानंतर भाविकांनी मंगलारतीत सहभागी होऊन यात्रेला मंगलारंभ मिळाला.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रवास, भोजन, निवास, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा या सर्व गोष्टींची अत्यंत काटेकोर आणि नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, स्वतः गणेश बोत्रे हे भाविकांची सेवा करताना दिसत आहेत
कधी भोजन व्यवस्थेत, कधी प्रवासातील चौकशीमध्ये, तर कधी ज्येष्ठ नागरिकांना मदत करताना. त्यांच्या या सेवाभावामुळे भाविकांमध्ये प्रचंड समाधान आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्विनी तरस यांनीही प्रत्येक महिलांच्या गटाकडे व्यक्तिगत लक्ष देत संपूर्ण यात्रेची शिस्त आणि सुरक्षितता प्रभावीपणे सांभाळली आहे.
महाकाल दर्शनाची दिव्यता आणि आयोजकांच्या सेवाभावामुळे उज्जैन नगरी सध्या भक्तिरसाने उजळून निघाली असून, भाविकांमध्ये अविस्मरणीय क्षणांचा अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. महाकालेश्वराच्या कृपेमुळे ही यात्रा आनंद, श्रद्धा आणि समाधानाचा सोहळा ठरत आहे.



