ताजा खबरपुणे

निवृत्त सेवकांना सातव्या कमिशनचा फरक तात्काळ द्यावा लागेल – अन्यथा उपोषण – नेते गोपाल तिवारी

इंटक कामगार संघटनेचे सल्लागार गोपाल तिवारी यांची आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे मागणी

Spread the love

पुणे. मनपा निवृत्त सेवकांना ७ व्या वेतन आयोगाच्या ‘फरकाच्या देणे रकमे पैकी’, तब्बल ३ वर्षात तीन हप्ते मिळाले, मात्र ४था व ५ वा हप्ता मिळणे अद्याप बाकी आहे. वास्तविक शासन आदेश (प्र. क. १८७ / नवि २२ / १६-०९-२०२१) व पुणे मनपा मुख्य सभा ठराव (क्र २५७ – १०-०३-२१) बघीतल्यास.. ‘दोन वर्षात अथवा मनपा आर्थिक स्थिती नुसार वा ३ हप्त्यात’ देणे बाबत निर्देश असतांना ही, वेतन आयोग फरक देण्यात पुणे मनपा प्रशासनाची दिरंगाई का.(?) असा प्रश्न करीत, सेवानिवृत्त सेवकांना तातडीने फरकाची रक्कम देण्याची विनंती वजा मागणी काँग्रेस नेते व इंटक कामगार संघटनेचे सल्लागार गोपा तिवारी यांनी मा आयुक्त राजेंद्रजी भोसले सो. यांजकडे केली.
अन्यथा कामगार संघटने सह ऊपोषण – आंदोलन करावे लागेल, असा ईशारा ही पत्रकारां सोबत बोलतांना त्यांना दिला.
या प्रसंगी पुणे मनपा निवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष श्री जयंत (बापू) पवार, कार्याध्यक्ष श्री संजीव मोरे, उपाध्यक्ष  श्री राजे भोसले व पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, पुणे मनपा निवृत सेवकांनी’ संयमाने व अडचणी सोसून ‘तीन हप्त्या मध्ये’ वेतन फरकाची रक्कम स्वीकारली आहे. ते म्हणाले की, वास्तविक, शासन आदेश व ठराव हे रक्कम देण्यासाठी पृष्टी देणारे असतील तर फरक सत्वर देणे बाबत मा आयुक्त सो यांनी आश्वासित ही केले होते.
मात्र लेखापालां कडून कार्यालयीन कार्यवाही बाबत.. दिशाभूल व असह्य दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ‘पुणे महानगरपालिके’चे वेगळे स्थान असून सांस्कृतिक राजधानी व ऐतिहासिक शहर म्हणून गणना होते. ‘पुणे मनपा प्रशासनाने कार्यक्षमतेच्या स्पर्धेत विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्वाइन फ्लू ,कोरोना साथीच्या काळात पुणे मनपा’च्या सर्व श्रेणीतील अधिकारी ते कनिष्ठ सेवकांनी तसेच पीमपीमएल सेवकांनी जोखीम घेऊन सेवा दिलेली आहे. पीमपीमएल निवृत्त-सेवकांना ही फरकाची रक्कम पूर्ण मिळालेली नसून, ‘पीएमपीएमएल’चे उत्तरदाईत्व देखील मनपा’कडे असल्याने त्यांचे बाबतीत ही सत्वर व सकारात्मक निर्णय बाबत PMPML चे ‘पदसिद्ध संचालक’ नात्याने मा आयुक्त यांनी लक्ष घालण्याची मागणी केली.
एकीकडे पुणे मनपा’चे महसु‌ली जमा रक्कम सु २०० कोटी हे बँकेत मुदत_ठेव म्हणून ठेवले जातात, मात्र उतार वयात, सेवा-निवृतांना आधार असलेले ‘हक्काचे पैसे’ वेळेत मिळत नाही, हे योग्य नाही, निवृत्ती नंतर ‘फरकाच्या रक्कमे’ची वाट पाहत सुमारे ३५ % सेवकांचे निधन झाले, याकडे ही लक्ष वेधले. सेवानिवृत्तांच्या हयातीत गरजेच्या काळात, ‘हक्काची रक्कम मिळाल्यास, त्याचे महत्व आहे.
या बाबत अधिक विलंब झाल्यास मनपा भवन बाहेर उपोषण – आंदोलन करू असा इशारा ही गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button