मराठी

श्रीगणेश उत्सवानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्यांचे परिचालन

मध्य रेल्वे ने जाहीर केलेल्या एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या आता ३०२ झाली आहे

Spread the love

श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त या ६ ट्रेन चालवण्यात येणार असून, यामुळे गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या आता ३०२ झाली आहे.

६ गणपती विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:

लोकमान्य टिळक टर्मिनस– मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ६ सेवा)

01003 साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार दि. २५.०८.२०२५, ०१.०९.२०२५ आणि ०८.०९.२०२५ रोजी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

01004 साप्ताहिक विशेष गाडी मडगाव येथून रविवार दि. २४.०८.२०२५, ३१.०८.२०२५ आणि ०७.०९.२०२५ रोजी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

आरक्षण: गणपती विशेष गाडी क्रमांक 01003 साठी आरक्षण ०५.०८.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि [www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल.

या विशेष गाड्यांचे थांबे व वेळांचा तपशील पाहण्यासाठी कृपया [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!