धर्मपुणेब्रेकिंग न्यूज़मराठी

दात हे शरीर- आरोग्याचे प्रवेशद्वार असुन, मानवी आरोग्यात दातांचे स्थान महत्वाचे…! – गोपाळदादा तिवारी

वारकरी सेवेसाठी ‘वैद्यकीय व्यावसायिक पुढे येणे हे शहराच्या संस्कृतीचे प्रतिक…!

Spread the love

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज’ पालख्यांचे आगमन प्रसंगी, वारकरी सेवेसाठी अनेक मंडळे, संस्था, राजकीय पक्ष इ बरोबरच, ‘वैद्यकीय व्यावसायिक ’ पुढे येणे हे पुणे शहराच्या संस्कृतीचे प्रतिक असून, जे एम रोड वरील ‘३२ स्माईल्स दंत चिकित्सा क्लीनिक’ चा आदर्श घेण्याजोगा असल्याचे, प्रतिपादन दंत चिकित्सा व कर्क रोग तपासणी प्रसंगी राजीव गांधी स्मारक समिति अध्यक्ष, काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

या प्रसंगी ३२ स्माईल्स चे संचालक डॉ. मिलिंद दर्डा, लॉयर्स सोसायटीचे संचालक अॅड.   फैयाज शेख, सहयोगी डॉ.  प्रियांका राठी, डॉ.  नँन्सी महाजन, डॉ.  निलू व्यास, डॉ.  भाव्या जैन, डॉ . घोष, ईशा राधा इ उपस्थित होते. सुमारे ५०० जणांनी चिकित्सा व औषधि इ चा लाभ घेतला..!

गोपाळदादा तिवारी  पुढे म्हणाले की, ‘शरीराच्या आरोग्यात दातांचे आरोग्य हे महत्वाचे’ असुन, दांत हे शरीर आरोग्याचे प्रवेशद्वार असल्याचे सांगीतले. ते पुढे म्हणाले की, घकाघकीच्या जीवनात डेंटीस्ट कडुन किमान ठरावीक वेळेनी दात क्लीनिंग करणे ही ‘एकंदर आरोग्य जपणारी चांगली सवय’ असल्याचे ही सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button