ब्रेकिंग न्यूज़मराठी

बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे उपक्रम ; प्रकाशशेठ रसिकशेठ धारीवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप

Spread the love

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने बचत गटांमधील महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पेपरपासून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्याच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पाच दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

शनिपार चौकाजवळील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या स्व. रसिक शेठ माणिकचंद धारीवाल भवन येथे ट्रस्टचे सहायक तथा माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाशशेठ रसिकशेठ धारीवाल यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी दिना धारीवाल, आदित्य धारीवाल, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृती जाधव उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यशाळेत कापडापासून तसेच कागदापासून निर्मितीची प्रक्रिया, विविध प्रकारच्या कागदांची माहिती तसेच फाईल एन्व्हलप, बॉक्स फाईल, कार्यालयीन फाईल्स, कागद व जुन्या वर्तमानपत्रांपासून पर्यावरणपूरक पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय विविध प्रकारचे आकाशकंदील तयार करणे, उत्पादनाचे कॉस्टिंग, मार्केटिंग, प्रिंटिंग प्रक्रिया तसेच आवश्यक यंत्रसामग्री आणि बाजारपेठेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

साखर संकुल येथील खादी ग्रामोद्योग केंद्रात आयोजित या प्रशिक्षण शिबिरात सोमवार पेठ, रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ आदी परिसरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव म्हणाले, महिलांनी कौशल्याधारित प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. अशा उपक्रमांमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होते. भविष्यातही ट्रस्टच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!