आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर ; जनजीवन विस्कळीत सर्व पुलावर महापुराचे पाणी ; ४०० बाधित

न आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : इंद्रायणी नदीचे लाभ आणि पाणलोट क्षेत्रा मध्ये होत असलेल्या पावसाने आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर आल्याने सर्व पुलावरून पाणी असल्याने रहदारी बंद झाली आहे. भाविक नागरिक यांची नदीवर महापुराचे पाणी पाहण्यास गर्दी झाली आहे. महापुराने नदी लगतच्या नागरिकांसह भाविक, संकटात सापडलेल्या नागरिक, २० पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रशासनास यश आले आहे. सुमारे चारशेवर जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आहे आहेत. या सुमारे १५० गोधन गोठ्यातील सुरक्षित स्थळी हलविले आहे. महसूल, पोलिस,अग्निशमन विभाग आणि नगरपरिषद प्रशासनाने भाविक, नागरिकांना महापुराचे संकटाने एकमेकांना सहकार्य करण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 
तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणीला महापूर आल्याने पुलावर पाणी आहे. रहदारी बंद झाली आहे. भाविक नागरिकांची नदी कडेला पाणी पाहण्यास नदी किनाऱ्यावर गर्दी झाली आहे. यावेळी सुरक्षातमक उपाय योजनेत पोलिस आणि नगरपरिषद प्रशासन यांनी नागरिकांसह भाविकांना आवाहन करीत धोकादायक परिसरात रहदारी न करता सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीचे दुतर्फा असलेल्या सर्व इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी रेस्क्यू पथक यांचे माध्यमातून परिश्रम पूर्वक हलविण्यात प्रशासनास यश मिळाले आहे. सुमारे चारशेवर लोकांना हलविण्यात आहे आहे. यात २० पोलिस भक्त निवासात अडकले होते. त्यांना ही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. गोपाळपूर, सिद्धबेट, भराव रस्ता, वाहनतळ पार्किंग, श्री राम मंदिर आदी ठिकाणी रेस्क्यू टीम ने परिश्रम पूर्वक कामकाज केले. यासाठी मुख्याधिकारी माधवराव खांडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, प्रांत अनिल दौंडे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींनी परिश्रम पूर्वक नियोजन केले. ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या भक्त निवासात पावसामुळे २० पोलीस कर्मचारी अडकले होते. पीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले आणि सर्व २० पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
एक आषाढी वारी मध्ये आळंदी ते पंढरपूर पर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका वाहून नेणारा रथ आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात उभा करण्यात आला होता. मात्र भक्त निवास इमारत व परिसरात इंद्रायणी नदीच्या महापुराचे पाणी शिरल्याने पालखी सोहळ्यात सहभागी होण्या करिता नव्याने तयार करण्यात आलेला रथ तसेच जुना रथ या पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. देवस्थानचे विश्वस्त आळंदीत पोहचू न शकल्याने आज ( दि.६ )रोजी नवीन रथाचा लोकर्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदी येथून होणार आहे. यासाठी दिंड्या आळंदीला येऊ लागल्या आहेत. सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे येथून सहभागी व्हावे असे जिल्हा प्रशासनाकडून सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना जाहीर सूचना देण्यात येत आहे. सर्वांनी सयंम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांत खेड अनिल दौंडे यांचेसह मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही केले आहे. संततधारेमुळे आळंदीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आळंदीत प्रवेशा साठीचे चारही पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने आळंदीचा संपर्क तुटला अशी. आषाढी वारी करिता दाखल झालेल्या वारकऱ्यांना मोठा फटका या मुळे बसला आहे. संततधारे मुळें संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर व परिसरात वारकऱ्यांची गर्दी नसून भाविकांना आहे त्याच ठिकाणी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदीकाठच्या स्कायवॉक वरील दर्शनबारी पाण्या खाली गेली असून पत्रे ही निघाले आहेत.काही पत्रे महापुराचे पाण्यात वाहून गेले आहेत.पीसीएमटी बस स्थानक परिसरात पुलावरील सरंक्षक जाळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवास इमारत परिसरात तसेच भराव रस्ता, गोपाळपूर,सिद्धबेट येथे पुराचे पाणी शिरले आहे.
पालखी सोहळ्यात माऊलींच्या चल पादुका वाहून नेणारा रथ पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे फ्रुट वाले धर्मशाळा येथे ठेवण्यात आला आहे. आषाढी वारीमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या नवीन रथाचा लोकार्पण सोहळा आळंदी देवस्थानने पुढे ढकलला.असून प्रदक्षिणा मार्ग, भराव रस्ता, बाह्यवळण मार्ग आदी ठिकाणी पावसाचे पाणी वाहत आहे.
बेसमेंट मधील अनेक दुकानां मध्ये पावसाचे पाणी शिरले असून आळंदी देवस्थानचे व्यापारी संकुल मधील दुकानदारांचे दुकानात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. इंद्रायणी नदी लगत असलेल्या पीसीएमटी बस स्थानक, स्मशानभूमी सह गोपाळपुरातील अनेक इमारतींना पाण्याचा विळखा पडला असून रहदारी बंद झाली आहे. आळंदीत गोपाळपूर, सिद्धबेट, ज्ञानेश्वरी मंदिर, राम मंदिर भागातील नागरिक, भाविक सुमारे २२०, इंद्रायणी नगर येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा सुमारे ४०८ वर भाविकांची पथकाने सुटका करून नगरपरिषदेने निश्चित केलेल्या सुरक्षित स्थळी हलविले आहे. माऊली मंदिरा समोरील भराव रस्त्या वरील हराळे वैष्णव धर्मशाळे समोरील रस्त्यावर पुराचे पाणी असल्याने रथ लोकार्पण सोहळा आळंदी देवस्थान ला करता आला नाही. परिसरातील दुकानदार यांनी दुकाने बंद ठेवून पोलिस प्रशासनाचे आवाहनाद प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी वीज बंद झाली असून संपर्क यंत्रणा देखील बंद पडली. आळंदीकर नागरिकांनी संकटात सापडलेले भाविक, नागरिक यांना मदत सहकार्य करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. आळंदी येथील भैरवनाथ ग्रामदेवता ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात आलेले जर्मन हँगर भाविकांचे निवाऱ्यासाठी काम सुरू आहे. येथे घुसलेले पावसाचे पाणी हटवण्यासाठी जेसीबी यंत्राचे सहाय्याने पाणी काढून देण्याचे काम स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतले आहे. येथे ही हजारो भाविकांची निवास व्यवस्था होईल असे मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी सांगितले.



