आळंदी पंचक्रोशीत सामाजिक बांधिलकीतून छत्र्यांचे वाटप
आशिष येळवंडे युवा मंच व सन्मार्ग फाऊंडेशन उपक्रम

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात उपयुक्त ठरलेल्या छत्र्याचें वाटप ऐन पावसाळ्यात अजून देखील सुरु ठेवण्यात आले आहे. आळंदी पंचक्रोशीतील गावा गावांतील घराघरांत जाऊन कुटुंबात ग्रामस्थ, नागरिकांना मोफत छत्र्याचें वाटप सामाजिक बांधिलकीतून सुरु आहे. सुमारे पाच हजरांवर छत्र्याचें मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरित कुरुळी जिल्हा परिषद गटात वाटप होत आहे.
आळंदी पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सोळु हद्दीतील घराघरांतील कुटुंबांना छत्र्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत निघोजे ग्रामपंचायत माजी सरपंच आशिष येळवंडे यांनी सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे. गोलेगांव, पिंपळगाव, सोळू, धानोरे, चऱ्होली खुर्द येथे उत्साहात छत्र्याचें वाटप करण्यात आले. आशिष येळवंडे युवा मंच व सन्मार्ग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थ, नागरिक, वृद्ध बेघर गरजू नागरिकांना दिसेल त्या ठिकाणी छत्र्या वाटप करण्यात आल्या. पावसाळ्यातील दैनंदिन अडचणी कमी करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष सहाय्यक ठरणार उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करण्यात आले. या उपक्रमातून सेवा, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला आला. उर्वरित भागात पुढील काळात उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सारखे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आशिष येळवंडे सन्मार्ग फाउंडेशनचे वतीने व्यक्त करण्यात आला.