ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

“शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील महत्वाचा घटक” – संदीप खर्डेकर.

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने शेतकरी बांधवांना रेनकोट वाटप" - सचिन कुलकर्णी.

Spread the love

“उपक्रमातील सातत्या मुळेच यश – सौ. मंजुश्री खर्डेकर.

पुणे.”शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील महत्वाचा घटक आहे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी जर पीक काढणे बंद केले तर काय अवस्था होईल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही कारण मांसाहार करणाऱ्यांना देखील गहू, तांदूळ, कांदा, मिर्ची, लिंबू,मसाला लागतोच ना असेही संदीप खर्डेकर म्हणाले. म्हणूनच ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विंग्रो शेतकरी आठवडी बाजारातील 40 शेतकरी बांधवांना रेनकोट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.

यावेळी मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी,आठवडे बाजाराच्या प्रवर्तक व मा.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,किरण देखणे,सुमित दिकोंडा,जगदीश डिंगरे,विंग्रो मार्केट चे सुजाता संदीप घगे,विकास पवार,संदीप भोसले,गणेश भाले,आतिश टेमकर,ओमकार फरगडे,शाम वाघमारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांविना आपण जगण्याची कल्पना करू शकत नाही म्हणून आज त्यांना वंदन करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत असे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी म्हणाले.आम्ही समाजात वेगळं कार्य करणाऱ्या व आपला ठसा उमटविणाऱ्यांच्या पाठीशी कायम उभं राहतो आणि त्यालाच अनुसरून गरजुंना मदत करून कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभते असेही ते म्हणाले.

मला मिळालेले यश हे उपक्रमातील सातत्यामुळे असून आठ वर्षांपूर्वी नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर जे उपक्रम सुरु केले ते आजही तसेच सुरु आहेत आणि नागरिकांच्या पसंतीस उतरले आहेत असेही सौ. खर्डेकर म्हणाल्या. शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून शेतातून थेट सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळं इ रास्त दरात उपलब्ध होतं म्हणून प्रभागातील नागरिक बाजाराची वाट बघतात असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. वटपौर्णिमेनिमत्त बाजारातील महिलांना साडया भेट दिल्या आता रेनकोट भेट देऊन शेतकऱ्यांना सन्मानित करत आहोत याचा आनंद वाटतो असेही त्या म्हणाल्या.

यापुढे देखील शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी व इतर उपक्रम राबविण्यात येतील असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!