मावळ तालुका मराठी पत्रकार संघ ,संलग्न देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश कांबळे यांची निवड

पिंपरी,(बद्रीनारायण घुगे ). मावळ तालुका मराठी पत्रकार संघ ,संलग्न देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी देहूरोड येथे झालेल्या बैठकित जाहीर करण्यात आली . मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी , तसेच सचिव रामदास वाडेकर , प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे यांच्या उपस्थित देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.दै. पुढारीचे पत्रकार रमेश कांबळे, यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.कार्यकारणी खालील प्रमाणे.
गणेश दुडम ( उपाध्यक्ष ) , चैत्राली राजापूरकर ( कार्याध्यक्ष ) , राजेंद्र काळोखे ( सचिव ), रामकुमार आगरवाल ( प्रकल्प प्रमुख ), मुकुंद परंडवाल ( सदस्य ), देवराम भेगडे ( सदस्य ) सचिन गायकवाड ( सदस्य ) बद्रीनारायण घुगे ( सदस्य ) आणि आकाश कानापुरम ( सदस्य ) अशी नव्याने जाहीर केलेली कार्यकारणी असून या कार्यकरणीचा कालावधी एक वर्षांचा असणार आहे.
जरी प्रत्येक पत्रकार हा वेगवेगळ्या वृत्तपत्रात ,वृत्तवहिनीत काम करीत असला तरी एकजूट महत्वाची आहे.म्हणूनच मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे.
कोट
प्रत्येक पत्रकाराच्या माघे मावळ तालुका पत्रकार संघ खंबिरपणे उभा राहील. नवीन तंत्रज्ञान आल्याने बातमीदारी करणं पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले असले तरी पत्रकारांच्या समोर विविध आवाहने उभी असतात त्यासाठी पत्रकारांची एकजूट महत्वाची आहे.
सोनबा गोपाळे ,जेष्ठ सल्लागार ,मावळ तालुका मराठी पत्रकार संघ
कोट
मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे.देहू – देहूरोड पत्रकार संघ आता या पत्रकार संघाशी संलग्न झाला आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावणे , सामाजिक उपक्रम राबविणे अशी उद्दिष्ट असणार आहेत.
सुदेश गिरमे, अध्यक्ष : मावळ तालुका मराठी पत्रकार संघ , मावळ



