चुनावब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

औंध-बोपोडी प्रभागातून नागरिकांचा एकच स्वर, कोरोना काळात ज्यांनी दिला मदतीचा हात, त्या वाडेकरांनाच आम्ही देणार साथ

पुणे, बोपोडी : कोरोना काळात संपूर्ण भारत कोरोना महामारीच्या भयानक आगीत होरपळतोय हे चित्र दिसत होतं. ती फक्त आग नव्हे तर वणवा होता. या वणव्याला जबाबदार ठरणारा प्रत्येक घटक लाखो डोळ्यांमधील अश्रूंना उत्तरदायी होता.

Spread the love

आपण सरणावरच्या प्रेताला आपुलकीचा खांदा द्यावा, असं म्हणत होतो. संकट काळात लोकांना मदत करावी, असं घरातील लहान मुलांना सांगतो. तसे संस्कार बिंबवतो. मात्र, अशी संस्कार बिंबवणारी, संस्कृती जगवणारी माणसंच त्या सरणाशिवाय, अंत्ययात्रेशिवाय अनंतात विलिन झाली. हे कोणत्या जन्माचं पाप असेल असं हजारो मृतदेहांच्या लाखो नातेवाईकांना वाटत होतं. उभा महाराष्ट्र तेव्हा कोरोना महामारीच्या भयानक आगीत होरपळ होता. ती फक्त आग नव्हे तर वणवा होता. या वणव्याला जबाबदार ठरणारा प्रत्येक घटक लाखो डोळ्यांमधील अश्रूंना उत्तरदायी होता. महाराष्ट्रातील या भयावह दृश्यांचा ठोस पुरावा दाखवणारी, मन सुन्न करणारी दृश्ये आठवली की आजही अंगावर काटा येतो.

ते जळणारे मृतदेह, काळ्या-पांढऱ्या पीपीई किटमध्ये स्मशानभूमीत टाहो फोडणारे नातेवाईक, त्यांच्या तोंडावर सुरक्षेसाठी असणारा मास्क, हे सारे दृश्य मन विषण्ण करणारे होते. संपूर्ण देशभरात हीच परिस्थितीती होती. स्मशानभूमींमध्ये अत्यंविधीसाठी मृतांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश अनेक ठिकाणी हीच परिस्थिती होती. एकीकडे भारताने कोरोना काळात एवढी प्रगती केली, इतकी साधनसामग्री तयार केली. इतर देशांना मदत केली, तर दुसरीकडे नि:शब्द करणारी ही भयान परिस्थिती. या तिरड्या फक्त निरापराध लोकांच्या नव्हत्या. महाराष्ट्रात या तिरड्या आश्वासनांच्या होत्या. संपूर्ण व्यवस्थेची अंत्यविधी होतेय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात अनेक शहरामंध्ये स्मशानभूमी, शवागृह, कब्रस्तान सगळ्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांचा खच पडला होता. स्मशानभूमी २४ तास सुरु होत्या. अनेक स्माशानभूमींबाहेर मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या. परिस्थिती हाताळण्यात प्रशासनही हतबल होताना दिसत होत.

संपूर्ण देशात जवळजवळ दोन लाख लोकांचा या महामारीत बळी गेला होता. देशभरात दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत होता. आजूबाजूच्या शहरांमध्ये सर्व स्मशानभूमी, कब्रस्तान फुल्ल झाले होते. बोपोडी मध्येही तीच भयानक अवस्था होती. पुणे वैकुंठ स्मशानभूमींबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. मृतांच्या अत्यंविधीसाठी आता जागेसह लाकडांचीही कमतरता भासू लागली होती. देशासह संपूर्ण महाराष्ट्रात हीच स्थिती निर्माण झाली होती.

भारतात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड घातक ठरली. ती लाट नाही तर अक्षरक्ष: त्सुनामीच होती, असं अनेकांचं मत होत. कोरोनाचा नवा विषाणू हा आता रुग्णांच्या थेट फुफ्फुस्यांवर परिणाम करत होता. शरीराच्या श्वसन प्रक्रियेवर हा विषाणू घात करतोय की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्या विषाणूमुळे रुग्णांचा जीव गुदमरायला लागला होता. बोपोडी भागांमध्ये परिणामी रुग्णांची संख्या वाढता ऑक्सिजनची मागणी वाढली होती.

मोठमोठ्या भाषणांच्या जेव्हा ‘तिरड्या’ निघत होत्या, आश्वासनांचं ‘स्मशान’ होतं आणि व्यवस्थेचा ‘अंत्यविधी’!.. त्यावेळेस नागरिकांच्या मदतीला धावून आली ती विठ्ठल-रुक्मिणी रुपी परशुराम वाडेकर व सुनिताताई वाडेकरांची जोडी…

बोपोडी रुग्णांलयांच्या बाहेर रुग्णांच्या उपचारासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी एका बेडवर दोन रुग्णांना झोपवलं जातंय. ज्या रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही त्यांचे नातेवाईक रस्त्यांवर वणवण फिरताना दिसत आहेत. असं दृश्य होत. वाडेकरांना पहावल गेलं नाही आणि त्यांनी ठरवलं मी अस नागरिकांना रस्त्यावर सोडणार नाही.

कोरोना काळात औंध-बोपोडीतून नागरिकांच्या हाकेला धावून आले ते परशुराम वाडेकर व सुनिताताई वाडेकर ही विठ्ठल-रुक्मिणी रुपी जोडी त्यांनी रिक्षा चालकांना व नागरिकांना धान्य किटचे वाटप केले. वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन अन्न वाटत केले. कित्येकांना औषधे उपलब्ध करून दिली. प्रभागांमध्ये ठिकठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात आली. लसीकरण, आरोग्य शिबिरे भरविण्यात आली. त्याचबरोबर पूरग्रस्तांचे स्थलानीकरण तसेच त्यांना दैनंदिन वस्तूंचे वाटप करण्यात आले.

रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागल्यामुळे जागोजागी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. बोपोडी मध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने बोपोडीतील खेडेकर हॉस्पिटल देखील कमी पडू लागले होते. त्यावेळेस ज्या रुग्णांची परिस्थिती अतिशय गंभीर होती त्यावेळेस त्यांना पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कोरोना काळामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून नागरिकांना ज्यांनी मदतीचा आधार दिला. त्या सर्वांना “कोरोना योद्धा” सन्मानाने गौरविण्यात आले. अशाप्रकारे “एक हात मदतीचा” ही संकल्पना राबवत जिवंत माणुसकीचा उदाहरण त्यांनी दाखवून दिल.

आज बोपोडीच्या कित्येक भागांमध्ये कोरोना काळात वाडेकर कुटुंबीयांनी नागरिकांप्रती दाखविलेल्या औदार्याचे गुणगान गाईल जातं. कोरोना काळात वाडेकर ताई कर्तुत्व रुपी आपल्या कर्तुत्वरुपी कामाने लोकांमध्ये प्रचलित झाल्या. त्या काळात कित्येक जण घरात होते परंतु परशुराम वाडेकर व सुनीताताई वाडेकर यांनी नागरिकांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिलं होतं याची पोच पावती सध्या निवडणुकीत प्रचारादरम्यान फिरत असताना लोकांच्या तोंडून त्यांच्याबद्दल कौतुकास्पद उद्गार निघत आहेत. हीच त्यांनी लोकांप्रती केलेल्या कामाची पोचपावती आज गणली जात आहे. व हीच प्रभागात त्यांची जमेची बाजू ठरत आहे. आणि त्यांना प्रभागातून नागरिकांप्रति भरगोस पाठिंबा मिळत असतानाचा दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!