आलंदीमराठीमहाराष्ट्र

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी” – सुरेश भट

शरदचंद्र पवार महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

Spread the love

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, डुडुळगाव ( आळंदी ) पुणे येथे जागतिक मराठी भाषा दिन, कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक, कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक – अध्यक्ष, गुरुदेव अध्यात्मिक शक्तीपीठ, आळंदी ह. भ. प. ज्योतिषचार्य, पांडुरंग महाराज शितोळे ( शास्त्री ), अध्यक्षस्थानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ होते.
मराठी विभाग, सहाय्य प्रा. डॉ. संजीव कांबळे यांनी या मराठी भाषा गौरव दिना निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्या मागील हेतू, उद्दिष्टे सांगितली. महाविद्यालयातील मराठी विभाग अतिशय तत्परतेने, नियोजन पूर्वक काम करीत आहे. या भाषा दिनाचे महत्त्व काय आहे? याचे प्रतिपादन केले. ह. भ. प. पांडुरंग महाराज शितोळे, यांनी संस्कृत भाषेपासून ते आज पर्यंत मराठी भाषेची स्थित्यंतरे कोणकोणती झाले. माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके | अमृता ते पैजासी जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मिळविन || श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला आणि पहिले मराठी भाषेचे बंड पुकारले. संत साहित्याने मराठी भाषेला दिलेले योगदान असामान्य आहे, कौतुकास्पद आहे. जगात मराठी भाषा कोठे कोठे बोलली जाते. मराठी भाषेचा गौरव बाहेरच्या देशातील कोणी कोणी केलेला आहे. मराठी भाषेची वैशिष्ट्य कोणती. अभिजात भाषेच्या दर्जा बद्दलची माहिती दिली. त्याचे महत्त्व काय आणि त्याचा काय उपयोग होईल.


अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ, यांनी `आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने | शब्दाचीच शस्त्रे यत्न करू ||१|| शब्दाची आमच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जान लोका ||२|| संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे मराठी भाषे बद्दल आमच्या घरी शब्द हेच धन आहे. शब्द हेच रत्न आहेत. शब्दाच्या शस्त्रानेच प्रयत्न करून आम्ही हे यश मिळवण्यासाठी तत्पर आहोत. आमचा देव देखील शब्दच आहे. नव्हे नव्हे. आमच्या जीवनाचे सारसर्वस्व शब्दच आहेत. तसेच आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला मराठी बोलण्याचे भाग्य लाभलेले आहे. मराठी भाषेचा महिमा, महत्त्व, श्रेष्ठत्व व थोरपण अनेक उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मराठीचे योगदान किती मोठे आहे. आपल्या मनामनांमध्ये, आपल्या रक्तामध्ये मराठी संचारते. हे मराठी भाषेचे वैभव आहे. मराठीच्या बोली जवळपास ५२ इतके आहेत. जागतिक मराठी भाषा दिन साजरा का केला जातो? याचाही आढावा, त्यांनी घेतला. संस्थेचे खजिनदार मयूर ढमाले यांनी या कार्यक्रमा मार्गदर्शन केले होते.
या कार्यक्रमास प्रा. रोहित कांबळे, प्रा. संतोष कदम, प्रा. प्रफुल्ल जाधव, प्रा. सविता मानके, प्रा. दिपाली ताम्हणे, प्रा.रणजीत कदम, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. माणिक कसाब, प्रा. दीपक देवकर, प्रा. प्रभाकर गायकवाड, प्रा. सीमा साळुंखे, प्रा. रूपाली औटी, पूजा खोडकर प्रा. सुरेंद्र पवार, प्रा. मीरा केसकर, प्रा. रेखा सुतार, प्रा. मीना शिंदे, प्रा. प्रतीक्षा शिंगाडे, प्रा. चित्रा पाटील, प्रवीण भावे, सचिन गावडे, देवानंद गोरडवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून आले होते. यास चांगला प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन, प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले. आभार प्रा. ताम्हाणे यांनी मानले. सामुदायिक पसायदानाने सांगता झाली. प्रा. , प्रसिद्धी विभाग प्रमुख यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!