पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – ना. चंद्रकांतदादा पाटील.
रोलबॉल स्टेडियम आच्छादित करण्याच्या कामाचे भूमिपूजन व खेळाडूंचा सत्कार संपन्न.

पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले, आईस स्केटिंग संस्थेचे अध्यक्ष व इंडियन ऑलम्पिक असोसिएशन चे सदस्य अमिताभ शर्मा यांनी केलेल्या मागणीवर ते बोलत होते. तुम्ही फक्त जागा द्या उभारणीचा खर्च आम्ही करू असेही श्री. शर्मा म्हणाले तोच धागा पकडून चंद्रकांतदादांनी हे वचन दिले. रोलबॉल ह्या खेळाने आता जागतिक पातळीवर मान्यता मिळविली असून पुण्यात जन्माला आलेल्या ह्या खेळासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर बालेवाडी भागात हे छोटेखानी स्टेडियम राखीव आहे असे मा. चंद्रकांतदादांनी नमूद केले.मात्र ते आच्छादित नसल्याने पावसाळ्यात वापर होत नाही तर उन्हाळ्यात त्याचा वापर करताना खेळाडूंची दमछाक होत असे हे लक्षात आल्यावर मी प्रयत्नपूर्वक यांस आच्छादित करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे आज भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
रोलबॉल च्या बालेवाडी येथील स्टेडियम ला आच्छादित करण्याच्या कामाचे भूमिपूजन ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी इंडियन ऑलम्पिक असो. व आईस स्केटिंग चे अमिताभ शर्मा, रोलबॉल चे जनक राजू दाभाडे सर, महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा रोलबॉल चे अध्यक्ष गजानन थरकुडे
नगरसेविका रोहिणी चिमटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मयुरी कोकाटे,नगरसेवक अमोल बालवडकर,स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोरसे साहेब,भाजपा चे मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, शिवम बालवडकर, राहुल कोकाटे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू उपस्थित होते.

यावेळी दुबई विश्वचषक स्पर्धा ,तसेच ६ व्या खेलो इंडिया विंटर गेम लेह इथे आईस स्केटींग स्पीड प्रकारच्या स्पर्धा येथील विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.दिनांक २० ते २६ जानेवारी दरम्यान लेह इथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राची अन्वयी देशपांडे (पुणे) हिने 1000 मीटरमध्ये रौप्य व 500 मीटरमध्ये कांस्य पदक, झलीन फर्नंडिस (मुंबई) हिने 500 मीटर मध्ये रौप्य व 1000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावले.
रॉर्ट ट्रैक प्रकारात ईशांत दारवेकर (पुणे) याने 1000 मीटरमध्ये सुवर्ण व 500 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले.
2000 मीटर मिक्स्ड रिले मध्ये
अन्वयी देशपांडे, शलीन फर्नांडिस, सोहन तारकर व ईशांत दारवेकर यांच्या संघाने सुवर्ण पदक मिळवले. प्रशिक्षक म्हणून श्री. निलेश शिंदे, (अहिल्यानगर) व सौ. जान्हवी चोरडिया (पुणे) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संघास श्री. सुहास पाटील उपसंचालक श्री. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक आणि सौ. अध्विनी थरीमखे क्रीडा अधिकारी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले तर श्री.उदय जोशी उपसंचालक आणि श्री.अरुण पाटील क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयीन कामाबाबत सहकार्य मिळाले.

तसेच दुबई इथे झालेल्या ७ व्या जागतिक रोल बॉल स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला या दोन्ही संघानी विजय मिळवत विश्वचषक पटकावले. या मध्ये आपल्या पुण्यातील पुरुष संघातील खेळाडू कृष्णा यादगिरी, हर्शल घुगे, प्रतिक साठे, रोहन दाभाडे आणि दादा भोरे संघ व्यवस्थापक, महिला संघातील खेळाडू सुहानी सिंग, श्रुती भगत आणि प्रशिक्षक प्राची फराटे तसेच भरतीय संघाचे फ़िजिओ म्हणून डॉ. सायली पोतनीस, डॉ. अखिल डोंगरे आणि पंच संकेत आवळे, प्रभाकर वडवंराव,
स्पर्धा अधिकारी मिलिंद क्षीरसागर, चेतन भांडवलकर, महेश उभे, संदीप खर्डेकर, अमोल काजळे पाटील यांना मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे यांनी रोलबॉल च्या प्रगतीची माहिती दिली, खेळाचे जनक राजू दाभाडे सर यांनी प्रास्ताविक केले तर महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.



