धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आळंदी माऊली मंदिरात धार्मिक विधी

इंद्रायणी नदीवर भाविकांची प्रथापरंपरांचे पालन करीत स्नानास गर्दी

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्रीक्षेत्र आळंदीत तीर्थक्षेत्रातील प्रथा परंपरांचे पालन करीत खग्रास चंद्रग्रहण दिनी मंगळवारी ( दि. ३ ) सायंकाळी ६:४४ ते ६:४८ या कालावधीत आलेल्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरे नुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हरिनाम गजरात झाले. ग्रहणा निमित्त श्रीनां पवमान अभिषेख, जलाभिषेक, धुपारती, महानैवेद्य उत्साहात झाला.
चंद्रग्रहण काळात श्रीनां विधीवत स्नान घालून अभिषेख पूजा करण्यात आली. भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीवर पाण्याचा जलाभिषेख करण्यास गर्दी केली. ग्रहण काल उरकल्यावर माऊली मंदिरात श्रींची पूजा, आरती, महानैवेद्य परंपरांचे पालन करीत आरती, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वेदमंत्रजयघोषात झाले. दैनंदिन धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने झाला. चंद्रग्रहणाच्या काळात मंदिरातील धार्मिक परंपरा जोपासण्यात आल्या. भाविक, नागरिकांनी परिसरात शांततेत व हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक श्रींचे दर्शनास गर्दी करून सहभागी होतात. इंद्रायणी नदीत वेदमंत्र साधक, विध्यार्थी, जप जाप करीत ग्रहणकाळातील विशेष विधींस साधकांनी गर्दी केली. हरिनामजय घोष आणि वेदमंत्राची साधना करीत ग्रहणात विधी परंपरांचे पालन करीत केल्याचे महंत मल्हार काळे यांनी सांगितले.
या वेळी राम कृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली, चंद्रग्रहण काळात अखंड नामजप साधक, भाविकांनी केला. इंद्रायणी नदीत उभे राहून वेदमंत्र, तंत्र साधकांनी ग्रहणातील प्रथा परंपरांचे पालन करीत चंद्रग्रहण पर्वणी साधली. इंद्रायणी नदीचे पाण्यात उभे राहून ध्यान धारणा, साधना करताना साधक मोठ्या प्रमाणात होते. सुमारे अडीच तास साधना केली. माऊली मंदिरात श्रींचे संजीवन समाधीवर जलाभिषेख भाविकांनी करण्यास गर्दी करून श्रींचे दर्शन केले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव हरे चा अखंड नाम जप या वेळी सुरु होता. दरम्यान सोमवारी ( दि. २ ) होलिकोत्सव विविध मंदिरांसह माऊली मंदिरात तसेच आळंदी पंचक्रोशीत हरिनाम गजरात झाला. या वेळी आळंदीतील घराघरांचे अंगणात होळी पूजन, पुरण पोळी नैवेध्य वाढविण्यात आला. उत्साहात होळी उत्सव परंपरेने संस्कृती जतन करत साजरा झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!