धर्मब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रशहर

योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९५ पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल पूजन

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन

Spread the love

पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे नाथषष्ठी निमित्त योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९५ पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल यांचे पूजन मंदिरात झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे प.पू.माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरु होते. त्यामुळे याचे पूजन महाराजांच्या ९० व्या पुण्यतिथी दिनी मंदिरात करण्यात आले.

यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त राजेंद्र बलकवडे यांसह ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते आदी उपस्थित होते.

 

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराजांची पुण्यतिथी म्हणजे समाधी दिन, हा दिवस नाथषष्ठीचा. प.पू. माधवनाथ महाराजांचा जन्म १८५७ रोजी चित्रकूट येथे झाला. त्यांची नित्य साधने म्हणजेच त्यांनी वापरलेले व्याघ्रासन व शाल रविवार पेठ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी कै.रंगनाथ नारायण होशिंग-आलेगांवकर यांना दिले.

 

ते पुढे म्हणाले, हे साहित्य गेली ९५ वर्षे रविवार पेठेतील पुजारी कै.बाळकृष्ण आलेगांवकर, कै.विनायक आलेगांवकर यांनी जतन केले. त्यांच्या पत्नी कै. पद्मजा आलेगांवकर व मुलगी गौरी गुमास्ते, राहुल गुमास्ते, देवेश गुमास्ते यांनी हा अमुल्य ठेवा जोपासला असून दत्तमंदिरात दरवर्षी भाविकांना दर्शनासाठी आणले जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांचे माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरू होते. त्यांच्या प्रेरणेनेच पुण्यातील जगद््विख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्रीमती लक्ष्मीबाई यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!