मराठी

धनकवडीत जागतिक महिला दिनानिमित्त घरेलू महिला कामगार मेळावा उत्साहात संम्पन

Spread the love

पुणे : महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना, पुणे जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त घरेलू महिला कामगार मेळाव्याचे आयोजन धनकवडी येथील राजमुद्रा संस्कृती भवन येथे सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी उत्साहात करण्यात आले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला कामगार सहभागी झाल्या.

या कार्यक्रमास सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय चिमाबाई दादासो पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता आणि संघटित होण्याची गरज अधोरेखित केली.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई पंडित होत्या. तसेच समर्थ मंडळाचे माजी अध्यक्ष भगवानराव देशपांडे हे मान्यवर म्हणून उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते संघटनेतील कार्यकर्त्या महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेच्या ज्येष्ठ महिला विभागाकडून मीनाताई पंडित यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच पुणे जिल्हा अध्यक्षा सुनीता बढे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर सरस्वती संगीत मंडळाच्या गायिका हेमलता थोरवे यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनालीताई परदेशी (अध्यक्ष, कर्तव्य फाउंडेशन) यांनी केले. प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा प्रभारी उषाताई जाधव यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर मीना पंडित, सुवर्णा कोंढाळकर, उषा जाधव, सुनीता बढे, रेबिका चंदनशिव, सुषमा फाटे, शीला आटपाळकर, शोभना लालन, शीला तांदळे, अनिता गुरव, सविता तांबट, मंदाकिनी पवार, योगिता शिंदे, जनाबाई कुडले, वर्षा ताडे, यशोदा साळवे, ज्योती मोरे, प्रणाली शिर्के, शैला शिंदे, मंगल भोसले, तृप्ती हजारे, नीता पंखावाला, कमल घाणेकर, वर्षा गुंजाळ, वनिता इवरे, सुमन गावडे, निर्मला साखरे, मनीषा शेळके, उर्मिला भूमकर आदी प्रमुख कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने घरेलू महिला कामगारांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!