मराठी

आषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

पुणे, दि. २७ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी २०२६ दरम्यान एचपीसीएलच्या पुणे एलपीजी प्रादेशिक कार्यालयाने राबविलेल्या एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला लाखो वारकरी, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी या दोन्ही पालख्यांसोबत एचपीसीएलची दोन एलपीजी सुरक्षा जनजागृती वाहने संपूर्ण वारी मार्गावर कार्यरत होती. या वाहनांवरील एलईडी स्क्रीनद्वारे मराठी भाषेत एलपीजी सुरक्षिततेवरील माहितीपट व जनजागृतीपर चित्रफिती सातत्याने प्रदर्शित करण्यात आल्या.

याशिवाय, मार्गावरील विविध शहरांमध्ये व गावांमध्ये एचपी गॅस वितरकांच्या सहकार्याने मोबाईल सेफ्टी क्लिनिक आयोजित करण्यात आले. या माध्यमातून सुरक्षित एलपीजी वापर, गॅस गळती प्रतिबंध, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी तसेच प्रत्यक्ष सुरक्षा प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानाद्वारे हजारो वारकरी व नागरिकांपर्यंत थेट पोहोचून घरगुती एलपीजीचा सुरक्षित वापर, गॅस गळतीची ओळख आणि अपघात प्रतिबंधाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

या अभिनव उपक्रमातून एचपीसीएलच्या पुणे एलपीजी प्रादेशिक कार्यालयाने सार्वजनिक सुरक्षा, ग्राहक जनजागृती आणि समाजहिताप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या धार्मिक यात्रेदरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाचे वारकरी, स्थानिक नागरिक आणि एचपी गॅस वितरकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत व कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!