अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे दिव्यांगांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत
पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची उपस्थिती ; तीन संस्थांना मदतीचा हात

पुणे : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये दिव्यांग प्रतिष्ठान चिंचवडगाव, सुकन्या अंध मुलांचे महिलाश्रम, यशस्वी महिला सामाजिक संस्था या तीन संस्थांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
कार्यक्रमाला पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस निरीक्षक अरुण घोडके, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले.
रंजनकुमार शर्मा म्हणाले, ज्यांना आवश्यकता होती, अशा संस्थांना मागील वर्षी मदत करण्यात आली होती. यावर्षी देखील दिव्यांग संस्थांना मदत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत मंडई म्हसोबा ट्रस्टकडून १० कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत गरजूंना देण्यात आली आहे. त्यामुळे धार्मिकतेतून विधायकतेकडे केले जाणारे हे कार्य प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.