ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
भारतीय संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन छावा संघटनेच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

पुणे प्रतिनिधी (शंकर जोग) ,भारतीय संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन छावा संघटनेच्या वतीने कोरेगाव पार्क, घोरपडी,मुंढवा, मगरपट्टा, बी टी कवडे रोड, या भागांमध्ये संविधान प्रस्तावनाचे वाचन करून उत्साहात दुचाकी रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून हर घर संविधान, घर घर संविधान, जनजागृती करण्यात आली.
यावेळी सोनाली उमाकांत म्हस्के, रिपब्लिकन छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत मस्के, रमाकांत म्हस्के, रोहन रोकडे, राकेश गुंडे, अंकुश माटे, चेतन जावळे, महबूब शेख, प्रफुल गवळी, राहुल पाटील, अभिजीत शिंदे, आदि यावेळी उपस्थित होते,



