खडकी पोलीस ठाण्यात निरोप व स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थितीने वाढला सोहळ्याचा मान

पुणे.खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. दिलीप फुलपगारे यांची पुणे शहर वाहतूक शाखेत बदली झाल्याच्या निमित्ताने त्यांचा निरोप समारंभ आणि नव्याने पदभार स्वीकारणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विक्रमसिंह कदम यांचा स्वागत समारंभ खडकी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आला।
या विशेष प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर कार्यकारिणी सदस्य गोपाळभाऊ वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खडकी विभाग अध्यक्ष रिकेश पिल्ले, वनवर्धनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय ढोणे, भिमराज युवा प्रतिष्ठान खडकीचे संस्थापक अध्यक्ष राज जगताप यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी मा. फुलपगारे साहेबांच्या खडकी परिसरातील उत्कृष्ट पोलिसिंग आणि जनसंपर्क कौशल्याचे कौतुक केले. त्याचबरोबर नव्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विक्रमसिंह कदम यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सकारात्मक पाऊले उचलली जातील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.खडकी पोलीस ठाण्याच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.