
शुक्रवार पेठेतील दोनशे वर्षांहून अधिक पुरातन मंदिरात मोगऱ्याची आरास
पुणे : मोगऱ्याची सुवासिक फुले, झेंडूची फुले आणि केळीचे खुंट वापरून सुशोभित करण्यात आलेल्या शुक्रवार पेठेतील दोनशे वर्षांहून अधिक पुरातन असलेल्या श्री उमा महेश्वर मंदिरात वासंतिक चंदन उटी सोहळा आयोजित करण्यात आला. चंदन उटी सोहळ्यासह मुक्त द्वार भंडारा देखील मंदिरात पार पडला.
श्री उमामहेश्वर मंदिर विश्वस्त मंडळ व व्यवस्थापक, आदिमाया प्रतिष्ठान स्वामी भक्त परिवार, नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट आणि सर्व वादक मित्रपरिवार यांच्यातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती.
हिंदुस्तान जागरण न्यासाच्या श्री उमामहेश्वर मंदिर विश्वस्त मंडळातील विनायक थोरात, कैलास सोनटक्के, गुरुनाथ शिरोडकर, महेश करपे, अमोल देशपांडे, प्रसाद डोईफोडे, आनंद कुलकर्णी, मंदिर व्यवस्थापक राजेंद्र टिपरे यांसह आदिमाया प्रतिष्ठान आणि नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट चे कमलेश कामठे, आनंद खंडेलवाल, स्वप्निल जोशी, अक्षय ढाकुळ आदी यावेळी उपस्थित होते.