ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

‘संविधानीक सुशिक्षितता’ सिद्ध करुनच, ‘फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीच्या ऋणातून’ महाराष्ट्र उतराई होईल..! – गोपाळदादा तिवारी

Spread the love

पुणे :   मानवजातीच्या ऊत्थानाचे मुळ हे केवळ शिक्षण असल्याचे ज्यांना माहीत होते, त्या महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले ऊभयतांनी, शिक्षणाची कवाडे’ राज्यातील सर्व जाती जमातीच्या स्त्री- पुरषांना सरसकट उपलब्ध करून देण्यासाठी संघर्ष केला, हाल अपेष्टा सोसल्या त्याचे ऋण महाराष्ट्रावर सदैव असल्याचे विधान महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. महात्मा फुलेच्या पुण्यतिथी चे औचित्याने, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय चे वतीने शेतकी कॅालेज’च्या महात्मा फुलें च्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.ह्या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, कृष्णा साठे, रविराज कांबळे, विकास अवचार, संदीप गायकवाड, अविनाश राठोड, ओम भवर हे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक शिव छत्रपतींच्या, संतांच्या, समाज सुधारक शाहू महाराज, महात्मा फुले, नामदार गोखले, डॉ आंबेडकर व आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शैक्षणिक दर व साक्षरता वाढून देखील ‘संविधानीक लोकशाही मुल्यां’ बाबतची अनास्था महाराष्ट्रास गर्तेच्या खाईत लोटणारी असल्याचे सद्य स्थितीचे वास्तव आहे.

 


‘ब्रिटिश कालीन स्वातंत्र्य पुर्व काळात, जातीय भेदा – भेद असतांना, समाजात शैक्षणिक क्रांतीची मशाल ज्यांनी पेटवली अशा महात्मा फुलें द्वयतांचे ऋण महाराष्ट्र विसरु शकणार नाही. शैक्षणीक शहाणपणाचे मोल स्वातंत्र्योत्तर भारताच्या निर्मितीस दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेत निश्चितच असले पाहिजे. त्यासाठी ‘संविधानीक जागरूकता व सुशिक्षितता’ सिद्ध करुनच ‘फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीच्या ऋणातून’ महाराष्ट्र उतराई होईल असे म्हणणे सार्थक ठरेल असे वक्तव्य ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी केले.
महाराष्ट्र एनएसयुआय चे उपाध्यक्ष  अक्षय कांबळे म्हणाले कि “महात्मा फुले म्हणायचे – ‘विद्या विना मती गेली. शिक्षणाशिवाय माणूस प्रगत होऊ शकत नाही, आणि जातभेद, लिंगभेद यांना हरवता येत नाही.’ आजही फुले यांचे विचार आपल्याला शिकवतात: ज्ञान घ्या, समानतेसाठी लढा आणि समाज बदलण्यासाठी पाऊल उचला!
अभिजीत गोरे म्हणाले कि महात्मा फुले यांचे विचार आजही आपल्यासाठी जीवनात दीपस्तंभ आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला अभिजीत गोरे म्हणतात – ‘चला, फुलेंच्या शिकवणींचा मार्ग अनुसरून ज्ञान मिळवूया, भेदभाव मिटवूया आणि समाज बदलण्यासाठी पाऊल टाकूया.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!