चौथी ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा !!
स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी, किरण क्रिकेट अॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे, ९ मेः स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित चौथ्या ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी आणि किरण क्रिकेट अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत विहान कारडेकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर स्पार्क क्रिकेट अॅकॅडमीने किरण क्रिकेट अॅकॅडमीचा ४० धावांनी सहज पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्क क्रिकेट अॅकॅडमीने २२.३ षटकामध्ये १४० धावांचे लक्ष्य उभे केले. रूद्र पाटीदार (३८ धावा), अधिराज धायगुडे (२० धावा) आणि विहान कारडेकर (नाबाद २० धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा डाव उभा केला. किरण क्रिकेट अॅकॅडमीच्या श्री राजगुरू याने २६ धावांमध्ये ५ गडी बाद केले. याला उत्तर देताना किरण क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १०० धावांवर संपुष्टात आला. स्पार्क संघाच्या विहान कारडेकर याने ५ धावांत दोन गडी बाद केले आणि संघाला सहज विजय मिळवून दिला.
दुसर्या सामन्यामध्ये राज नेरकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे किरण क्रिकेट अॅकॅडमीने २२ याडर्स क्रिकेट अॅकॅडमीचा १८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या किरण क्रिकेट अॅकॅडमीने १४७ धावांचे लक्ष्य उभे केले. राज नेरकर याने सर्वाधिक २७ धावा केल्या तर, सईशा वारे हिने नाबाद १५ धावांची खेळी केली. किरण अॅकॅडमीच्या औदुंबर ए. याने २१ धावांत ४ गडी टिपले. याला उत्तर देताना २२ याडर्स क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १२९ धावांवर मर्यादित राहीला. तनिश खेताळे (३१ धावा) आणि औदुंबर ए. (२६ धावा) यांनी प्रतिकार केला. किरण संघाच्या अभिनव पाडेकर याने १९ धावात २ गडी तर, राज नेरकर याने २९ धावांमध्ये एक गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पार्क क्रिकेट अॅकॅडमीः २२.३ षटकात १० गडी बाद १४० धावा (रूद्र पाटीदार ३८, अधिराज धायगुडे २०, विहान कारडेकर नाबाद २०, श्री राजगुरू ५-२६, देवांश पाटील २-२६) वि.वि. किरण क्रिकेट अॅकॅडमीः २१.१ षटकात १० गडी बाद १०० धावा (श्री राजगुरू ११, सायली वारे १०, विहान कारडेकर २-५); सामनावीरः विहान कारडेकर;
किरण क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ६ गडी बाद १४७ धावा (राज नेरकर २७, सईशा वारे नाबाद १५, अवांतर धावा ७६, औदुंबर ए. ४-२१, अबिर तोपारे १-२९) वि.वि. २२ याडर्स क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ५ गडी बाद १२९ धावा (तनिश खेताळे ३१, औदुंबर ए. २६, अभिनव पाडेकर २-१९, राज नेरकर १-२९); सामनावीरः राज नेरकर;