धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

आळंदीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास वैष्णवांचा मेळा हजारो भाविकांचे हरिनाम जयघोषात पारायण सोहळा

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात मंगळवारी ( दि. ६ ) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह अन्नदान, ज्ञानदान यज्ञाचे आयोजन उत्साहात हरिनाम गजरात करण्यात आले. यामध्ये सकाळी सहा ते दहा या वेळात एकनाथ महाराज कोष्टी यांच्या नेतृत्वात पारायण सोहळा हरिनाम जयघोषात झाला. पहिल्या सत्रात प्रसाद महाराज बडवे, दुसऱ्या सत्रात कीर्तन सेवा पांडुरंग महाराज घुले यांनी सेवा रुजू केली. दरम्यान चार वाजता रामकृष्ण महाराज लहवितकर यांची प्रवचन सेवा झाली. चरित्र चिंतन सेवेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चरित्र चिंतन सेवा चैतन्य महाराज देगलूरकर यांनी दिली. संगीत भजन सेवेत वारकरी सांप्रदायिक भजन झाले. यात परमेश्वर महाराज जायभाय, पंढरीनाथ महाराज आरू, महेश महाराज भगुरे, ज्ञानेश्वर महाराज मेश्राम यांनी आपली संगीत भजन सेवा हरिनाम गजरात रुजू केली. राज्य परिसरातून भाविक भक्त वारकरी या सोहळ्यास आळंदी मध्ये आले असून मोठ्या उत्साही आनंदी ज्ञान भक्ती मे वातावरणामध्ये धार्मिक सांस्कृतिक तसेच ज्ञानदानाची पर्वणी लाभली असून आळंदी परिसरातील नागरिक भाविक मोठ्या आनंदात या परभणीत सहभागी झाले आहेत हजार वारकरी भाविकांना या ठिकाणी अन्नप्रसाद पाठक होत असून उत्साही आनंदी वातावरणात आंदेकर ग्रामस्थांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होत आहे.


हजारो भाविकांच्या उपस्थितीत आळंदीत श्री ग्रंथराज पारायण सुरु आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे नेतृत्व एकनाथ महाराज कोष्टी करीत आहे. त्यांचे सुश्राव्य वाणीतून पारायण सोहळा सुरु आहे. चौथ्या दिवशी मंगळवारी ( दि. ६ ) तेरावा अध्याय अध्याय सुरु आहे. सप्ताहाचे मध्यावर पारायण सोहळा आला आहे. सुमारे चार हजारावर ओव्यांचे वाचन झाले आहे. यात गुरुवारी तेराव्या अध्यायातील गुरुभक्ती वर आधारित ९० ओव्यांचे सामूहिक वाचन गायन झाले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील १३ व्या अध्यायात ओवी क्रमांक ३६९ ते ४६१ ओवी पर्यंत गुरुभक्ती सांगितली आहे. यावेळी एकनाथ महाराज कोष्टी यांनी प्रत्येकाने एक तरी ओवी अनुभवावी असे आवाहन केले. या ओव्यांचे सार्थ पाहून जीवनात त्या प्रमाणे अनुकरण करण्यास त्यांनी आवाहन केले. पारायण सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून राज्य परिसरातून भाविक हजारोंचे संख्येने सहभागी झाले आहेत. आळंदी देवस्थान आणि आळंदी ग्रामस्थ यांनी संवादातूनन खूप छान नियोजन केले आहे. नागरी सेवा सुविधांसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर सोहळ्याचे नियोजनास परिश्रम घेत आहेत. दरम्यान कीर्तन सेवेत अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री, कामगार मंत्री ऍड आकाश फुंडकर यांनी आळंदीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास भेट देऊन कीर्तन प्रसंगी उपस्थित रहात आळंदी देवस्थानचे विश्वस्तानशी संवाद साधला. यावेळी देवस्थान तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. सोहळ्याचे चौध्या दिवशी देवस्थानचे अध्यक्षा तथा पुणे जिल्हा प्रमुख, जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी सप्ताहास भेट देत कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!