‘दगडूशेठ’ गणपतीला २५१ किलोचा रसमलाई मोदक केक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक केक अर्पण करण्यात आला. डब्लू.एस.फूड्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे यांनी हा मोदक आकाराचा रसमलाई केक तयार केला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्या वतीने १३३ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात भाविक विविध प्रकारचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करतात. मात्र, पुण्यातील डब्लू एस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रथमच एवढा भव्य मोदक आकाराचा रसमलाई केक अर्पण केला आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबद्दल बोलताना डब्लू.एस. फूड्स चे संस्थापक सुदेश अगरवाल म्हणाले, आम्ही २५१ किलोचा मोदक आकाराचा रसमलाई केक अर्पण केला आहे. या केकला तयार करायला १० ते १२ तासाचा वेळ लागला आणि जवळपास १५ ते १८ जणांनी मिळून हा केक बनवला आहे.